Corona Updates  sakal media
मुंबई

चौथ्या लाटेबाबत BMC चे टास्क फोर्ससोबत विचारमंथन; येत्या आठवड्यात निष्कर्ष काढणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविडच्या चौथ्या लाटेसंदर्भात (corona fourth wave) पालिकेने टास्क फोर्ससोबत (corona task force) विचारमंथन करणे सुरू केले आहे. इतर देशांमध्ये आलेल्या चौथ्या लाटेच्या अभ्यासावरून धोका किती, कसा, तीव्रता कशी असेल, कुठे ही लाट वाढली आहे, या सर्वाचा अभ्यास टास्क फोर्स करत असून येत्या आठवड्यात याबद्दलचा निष्कर्ष काढला जाईल, असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (suresh kakani) यांनी सांगितले.

काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, टास्क फोर्ससोबत विचारमंथन सुरू असून अभ्यासातून जो काही अंदाज निघेल त्यानुसार पालिका आपली धोरणं ठरवेल आणि त्यानुसार उपाययोजना राबवल्या जातील. येत्या दोन ते तीन दिवसांत टास्क फोर्सचा अहवाल मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, संभाव्य चौथ्‍या लाटेचा धोका हा नागरिकांच्या कोविड वर्तणुकीतून जास्त बळावू शकतो, अशी गंभीर शक्यता कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. यासह मुंबईत कोविड रुग्णांमध्ये हळूहळू घट होत असली तरी वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एप्रिल आणि मे या आगामी उन्हाळ्यात नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. कारण कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान दिसलेल्या ट्रेंडमुळे सावधगिरी बाळगली गेली पाहिजे.

कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, उन्हाळ्यात आर्द्रता जास्त असते आणि आर्द्रता वाढली की विषाणू संसर्ग वाढतो, असे गेल्या तीन लाटांच्या ट्रेंडमधून दिसून आले आहे. ट्रेंड विविध आहेत. भारतात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कोविड लाटेने शिखर गाठले होते. तिसऱ्या लाटेसह ओमिक्रॉनचा धोकाही कमी आहे. नवीन लाट येण्याचा धोका कमी असला तरी नागरिक कोविड वागणूक योग्य पद्धतीने पाळत नाहीत, जर एखादा सक्रिय व्हायरस असेल तर आणि नवा व्हेरिएंट आला तर चौथ्या लाटेची शक्यता वाढेल. सध्या तरी सहा ते नऊ महिने कोणताही धोका नाही.

डॉ. शशांक जोशी म्हणाले की, कोविडचा स्पाईक टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे घराबाहेर तसेच कार्यालये, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी मास्क वापरणे. याव्यतिरिक्त लसीकरण करणे आणि शक्य तितक्या नागरिकांना बूस्टर डोस देणे सुरू ठेवले पाहिजे. जेव्हा लाट ओसरते तेव्हा नागरिक मास्क वापरत नाही, काळजी घेत नाहीत, लसीकरण करून घेत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या संभाव्य चौथ्या लाटेचे वेळापत्रक नागरिक ठरवतील. मुंबईसह राज्यात आलेल्या पहिल्या दोन लाटा या उन्हाळ्यात आल्या. मग तिसरी लाट ओमिक्रॉनची आली, ती मात्र हिवाळ्यात आली. कारण ओमिक्रॉन हा नाक आणि घशात जाणारा व्हेरिएंट असल्यामुळे तो हिवाळ्यात आला. पण आता नवा व्हेरिएंट येण्याची शक्यता धूसर आहे, पण नागरिकांनी सर्व नियम पाळले गेले पाहिजेत.

उन्हाळ्यात काळजी घ्यावी!

पहिली आणि दुसरी लाट ही उन्हाळ्यात आली होती. कोविडसंबंधी वर्तणूक आणि लसीकरणावर भर दिला पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या लाटा थांबवता येतील. भविष्यातील संभाव्य लाट रोखण्यासाठी ‘ट्रॅकिंग’ सुरू ठेवले पाहिजे. पालिकेने पहिल्या लाटेपासून चाचणी आणि ट्रॅकिंग पद्धत सुरू ठेवली होती. पण रुग्णसंख्या जास्त असल्याने ट्रॅकिंग नेहमीच शक्य नव्हते. आता दैनंदिन संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे आक्रमक पद्धतीने ट्रॅकिंग केले गेले पाहिजे, असे टास्क फोर्स सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT