strike  Sakal media
मुंबई

गिरणी कामगारांना घराचा ताबा नाही; आझाद मैदानात करणार धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

प्रभादेवी : गिरणी कामगारांना (Mill Workers) मुंबईतच घरे देऊन पुनर्वसन करण्याचा निश्चित कार्यक्रम जाहीर करण्याच्या मागणीकरिता सर्व श्रमिक संघटनेसह गिरणी कामगार व वारसदार गुरुवारी (ता. १०) आझाद मैदान (Azad Maidan) येथे धरणे आंदोलन (strike) करणार आहेत. गिरणी कामगारांना घरे (House for mill workers) देण्याचा कायदा होऊन २० वर्षे झाली. या कालावधीत तुटपुंज्या घरांची लॉटरी काढली गेली. तसेच १५ हजार गिरणी कामगार व वारसांना घरांचे वाटप करण्यात आले.

यातील ५० टक्के गिरणी कामगार व वारसांना घराचा ताबा मिळालेला नाही. हे वास्तव लक्षात घेता अर्ज केलेल्या एक लाख ७० हजार गिरणी कामगार व वारसांचे, घरे देऊन पुनर्वसन करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करावा, या मागणीकरिता आंदोलन करीत असल्याचे सर्व श्रमिक संघटना गिरणी कामगार विभागाचे अध्यक्ष कॉ. बी. के. आंब्रे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

कामगारांच्या विविध मागण्या

गिरणी कामगारांचे मुंबईत घरे देऊन पुनर्वसन करा, म्हाडाकडे केलेल्या घरांच्या अर्जाची छाननी करा, घरांच्या सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगार व वारसदारांना विनाविलंब घरांचा ताबा द्या, अशा मागण्या पत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Crowd Videos: महत्त्वाची बातमी! स्थानकांवरील गर्दीचे जुने व्हिडिओ व्हायरल कराल तर खबरदार... रेल्वे प्रशासनाचा कडक इशारा

एक खून आणि अनेक भास ! उत्कंठा वाढवणारा असंभव सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज

Oneplus Discount : दिवाळी-धनत्रयोदशीला OnePlus ची गोल्डन डील! अर्ध्या किंमतीत मिळू लागलेत हे प्रीमियम मोबाईल, इथे सुरुय ऑफर..एकदा बघाच

Scholarship Exam: शिष्यवृत्ती परीक्षेत पुन्हा बदल! पुढील वर्षापासून चौथी, सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

Latest Marathi News Live Update : पूरग्रस्त कुटुंबियांना आमदार संजय बनसोडे यांच्याकडून 53 लाखाची मदत

SCROLL FOR NEXT