MIDC Chemical Water sakal media
मुंबई

डोंबिवली : एमआयडीसीतील नाल्यात केमिकल मिश्रित पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक विभागातील (MIDC) रासायनिक कारखान्यांमुळे प्रदूषणाच्या समस्या (pollution problems) उद्भवत असून स्थानिकांना त्याचा त्रास होत आहे. राज्य शासनाने १५६ रासायनिक कारखाने (chemical company) स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप त्यावर पुढे कोणतीही कारवाई झालेली नाही. सोमवारी पुन्हा येथील रासायनिक कारखान्यांमुळे नागरिकांना उग्र वास, डोळे चुरचुरणे, उलट्या यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागला. एमआयडीसी फेज २ मधील नाल्यात रसायनमिश्रित पाणी (chemical water) सोडण्यात आल्याने सकाळपासून नागरिकांना हा त्रास होत होता. प्रशासन रासायनिक कारखान्यांविषयी केवळ घोषणा करणार की कारवाई करणार, असा संतप्त सवाल येथील नागरिक करत आहेत.

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या वायूमुळे, तसेच रसायन मिश्रित पाण्यामुळे निवासी भागातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रासायनिक प्रदूषणामुळे एमआयडीसीत हिरवा, नारंगी पाऊस, त्यानंतर रसायनामुळे गुलाबी, निळे रंग प्राप्त झालेले रस्ते यापूर्वी पाहिले आहेत. पावसाळ्यात नांदिवली येथील नाल्याला चक्क हिरवा रंग देखील प्राप्त झाला होता. या सर्व घडामोडी पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी डोंबिवली एमआयडीसी परिसराचे सर्व्हेक्षण केले होते.

त्यानंतर आता काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला असून याची घोषणा करण्यात आली असली तरी याविषयी अद्याप कोणतीही पावले पुढे उचलली गेली नाहीत. सोमवारी एमआयडीसी फेज २ मधील गणेश नगर आशापुरा मंदिर परिसरातील नाल्यात काही कंपन्यांमधून रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे या नाल्यातील पाणी पूर्णपणे गडद निळ्या रंगाचे झाले होते. या पाण्याला उग्र वासदेखील येत होता. या वासामुळे परिसरातील नागरिकांना डोळे चुरचुरणे, मळमळणे, उलट्या, श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता.

पाण्यात निळ्या रंगाचे केमिकलमिश्रित पाणी सोडण्यात आल्याने त्याला उग्र वास येत होता. यामुळे श्वसनाचा त्रास, डोळे चुरचुरणे याचा त्रास झाला. याविषयी सातत्याने आम्ही प्रशासनाकडे विषय मांडण्याचा प्रयत्न करतो, पण प्रशासन लक्ष देत नाही. या कंपन्यांवर निर्बंध घालावेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची सरकारकडे
मागणी आहे.

- शशिकांत कोकाटे, स्थानिक रहिवाशी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT