Murder crime sakal media
मुंबई

पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादात एकाची हत्या; आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा

खर्डी : पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादात एकाची हत्या (Murder crime) झाल्याची घटना खर्डीतील (Khardi crime update) बागेचा पाडा येथे घडली. राजेश पवार (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या अमोल काकड (culprit arrested) (वय २२) याला सिन्नरजवळ अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक रोहिदास केंद्र यांनी दिली.

अमोल रमेश काकड याने दोन वर्षांपूर्वी राजेश पवार याच्याकडून मोबाईल घेण्यासाठी पैसे घेतले होते; परंतु दोन वर्षांनंतरही पैसे परत न दिल्याने राजेशने अमोलला याबाबत जाब विचारला. यातून वाद वाढत गेला आणि अमोलने रागाच्या भरात राजेशवर धारधार हत्याराने पोटावर वार केले.

राजेश याला तत्काळ मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते; परंतु त्याच्यावर उपचार सुरू असताना ३० मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. खर्डी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस निरीक्षक रोहिदास केंद्रे, एम. दहावड, एस. थालेकर व अंबर कांबळे यांनी अमोल काकड यास अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : नागपुरात हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; रात्री जोरदार पावसाची हजेरी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT