Corona Center sakal media
मुंबई

कोविडच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता; जम्बो केंद्र एप्रिलपर्यंत सुरूच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविडशी प्रतिबंधात्मक निर्बंध (covid curbs) सरकारने मागे घेतले असले, तरी चार जम्बो कोविड केंद्रांचे (jumbo corona center) भवितव्य अद्याप पालिकेने ठरवलेले नाही. पालिका विभागाच्या (bmc) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्व जम्बो केंद्र एप्रिलच्या अखेरपर्यंत सुरूच राहणार आहेत. सध्या कोविडच्या संभाव्य चौथ्या लाटेची (corona fourth wave) शक्यता लक्षात घेऊन पालिकेने ही योजना थांबवली आहे.

तिसरी लाट ओसरल्यानंतर पालिकेने आपल्या जम्बो कोविड केंद्रांपैकी चार केंद्र तोडण्याचा निर्णय घेतला होता. ज्यात रिचर्डसन आणि क्रुडास (मुलुंड), दहिसर जम्बो सेंटर, क्रॉम्प्टन आणि ग्रीव्हज (कांजूरमार्ग) आणि नेस्को जम्बो सेंटर (गोरेगाव) यांचा समावेश आहे. अतिरिक्त पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार या केंद्रांचा शेवटचा कामकाजाचा दिवस २८ फेब्रुवारी होता, परंतु आयआयटी कानपूरच्या अभ्यासात जून-जुलैमध्ये भारतात कोविडच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने पालिकेने केंद्रे तोडण्याची योजना थांबवली आहे.

टास्क फोर्सच्या संमिश्र प्रतिसादामुळे पालिकेने मार्चअखेरपर्यंत केंद्रे नष्ट करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. आता एप्रिल महिना सुरू झाला असून पालिकेला याबाबत निर्णय घ्यायचा आहे. खासगी रुग्णालय आणि कोविड केंद्रांचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी म्हणाले, की सर्व केंद्रे सुरू ठेवायची की काही केंद्रे सुरू ठेवायची हा एक मोठा निर्णय आहे. सध्या हाँगकाँग, चीन आणि काही युरोपीय देशांत कोरोना रुग्ण वाढले आहेत. पालिका लवकरच योग्य तो निर्णय घेईल. जम्बो कोविड सेंटरची देखभाल करणाऱ्या आरोग्य विभागातील आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले, की प्रशासनाची कोंडी झाली आहे. समजा आपण चार केंद्रे बंद केली आणि अचानक रुग्णांमध्ये वाढ झाली तर पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागेल.

देखभालीवर कोट्यवधीचा खर्च

पालिका जम्बो कोविड केंद्रांच्या भाड्यावर आणि देखभालीवर मोठी रक्कम खर्च करत आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या मते, सध्या मुलुंड जंबो सेंटरसाठी सुमारे चार ते साडेचार कोटी रुपये आणि दहिसर जंबो सेंटरसाठी सुमारे ३.४ कोटी रुपये खर्च येतो. कांजूरमार्ग जंबो कोविड सेंटरचा सध्याचा ६.४ कोटी खर्च आहे आणि जवळपास तेवढीच रक्कम नेस्कोसाठी खर्च होते. वरील केंद्रांमध्ये ५ ते ६ डॉक्टर, तेवढ्याच परिचारिका आणि ऑडिटच्या कामासाठी मोजके कर्मचारी आहेत.

तज्ज्ञांच्या बैठकीनंतर निर्णय

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, की पुढच्या आठवड्यात आम्ही तज्ज्ञांसोबत बैठक घेणार आहोत आणि कदाचित निर्णय घेऊ. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार ३१ मार्चला मुंबईत कोरोनाचे केवळ २८० सक्रिय रुग्ण आहेत. कोविड रुग्णांसाठी राखीव असलेल्या २६,२२८ खाटांपैकी केवळ १५ खाटा भरलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw : १८ चेंडूंत ७२ धावा… पृथ्वीचे वादळी शतक, Ranji Trophy स्पर्धेच्या इतिहासातील सहावी वेगवान Century

महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, एका विवाहितेच्या आत्महत्येशी संबंध? शवविच्छेदन अहवाल बदलण्याचं रॅकेट?

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी शिवसेना नेत्याची सून होणार, साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल, होणारा नवरा काय करतो?

UPI Mapper ने घातलाय धुमाकूळ! UPI अ‍ॅप्सच्या हुशारीमुळे युजर्स गोंधळात; NPCI ने घेतला मोठा निर्णय, ऑनलाइन पेमेंट करत असाल तर हे एकदा बघाच

Kolhapur Politics : 'आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरला 50 वर्षे मागे नेले'; खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT