Bird Sakal media
मुंबई

मुंबई : पशू-पक्ष्यांच्या मदतीसाठी ‘स्पॅरोज शेल्टर’चे आवाहन; आजारी पक्ष्यांवर उपचार

सकाळ वृत्तसेवा

धारावी : दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्याचा तडाखा माणसांबरोबर पशू-पक्ष्यांनाही (Bird-Animals) जाणवू लागला आहे, म्हणून एप्रिल- मे महिन्यातील कडक उन्हाच्या दिवसांत (Summer hit) पशू-पक्ष्यांच्या बचावासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘स्पॅरोज शेल्टर’ संस्थेतर्फे (Sparrow shelter organization) करण्यात आले आहे. संस्थेच्या स्वयंसेवकांनी महिनाभरात जवळपास १५० ते २०० उष्माघाताने आजारी पक्ष्यांवर उपचार केल्याची माहिती संस्थेच्या प्रवक्त्याने दिली आहे. ''स्पॅरोज शेल्टर’ ही संस्था गेली १३ वर्षे पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी प्रयत्नरत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याअभावी व उन्हाच्या तडाख्याने पक्ष्यांचे जीव धोक्यात येत असल्याचे ओळखून संस्थेच्या स्वयंसेवकांनी ठिकठिकाणी घरगुती व सार्वजनिक ठिकाणी पाणपोई सुरू केली आहे. तशाच पद्धतीने सर्व नागरिकांनी आपल्या घरासमोर छोट्या वाटीद्वारे पक्ष्यांसाठी ताजे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले आहे.

घार हा पक्षी आकाशात खूप उंचावर उडतो. त्यामुळे त्या पक्ष्याला उन्हाचे जोरदार तडाखे बसल्यामुळे उष्माघाताने असे पक्षी जमिनीवर चक्कर येऊन पडतात. त्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागतो. जास्त उष्मा असेल तर निर्जलीकरणामुळे हे पक्षी घायाळ होतात. मृत्युमुखी पडतात. त्यावर उपाय म्हणून नागरिकांनी इमारतीच्या गच्चीवर मुबलक पाण्याची सोय करावी, असे आवाहन ‘स्पॅरोज शेल्टर’चे अध्यक्ष प्रमोद माने यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT