Manoj vyas from rajasthan on the way to mumbai sakal media
मुंबई

बेरोजगारीच्या झळा! राजस्थानच्या तरुणाचा भिलवाडा ते मुंबई पायी प्रवास

सकाळ वृत्तसेवा

मनोर : राजस्थानमधील (Rajasthan) सरकारी उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे असंख्य तरुणांना बेरोजगारीच्या झळा (Unemployment impact) सोसाव्या लागत आहेत. बेरोजगारीमुळे निर्माण झालेल्या असंख्य अडचणींवर मात करण्यासाठी माझ्या जिल्ह्यात गुंतवणूक करा, अशी विनवणी करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची भेट घेण्यासाठी शेकडो किलोमीटर अंतर चालत राजस्थान राज्यातील भिलवाडा जिल्ह्याच्या गंगापूरचा निवासी मनोज व्यास (२१) हा तरुण मुंबईकडे चालत निघाला आहे. ११ मार्चला दुपारी १ वाजता त्याने गंगापूरवरून मुंबईच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती. मजल-दरमजल करीत सोमवारी (ता. ४) त्याने मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मनोर गाठले आहे.

उद्योजक मुकेश अंबानी यांनी जिल्ह्यात गुंतवणूक करावी, या मागणीचे ध्येय घेऊन भिलवाडा ते मुंबईपर्यंतचा सुमारे साडेनऊशे किलोमीटरचा प्रवास चालत पार करण्याचा निर्धार मनोज व्यासने व्यक्त केला. तो पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे.राजस्थान राज्याच्या भिलवाडा जिल्ह्यातील गंगापूर भागात असलेल्या धाग्याच्या अनेक मिल्स शासकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचारामुळे बंद पडल्या आहेत. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांनी भिलवाडा जिल्ह्यात आर्थिक गुंतवणूक केल्यास रोजगार उत्पन्न होऊन स्थानिकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होणार आहे, असे मनोज याने सांगितले.

दररोज २५ ते ३० किलोमीटरची पायपीट

आपण दिवसाला २५ ते ३० किलोमीटर अंतर चालत असून महामार्गालगतच्या हॉटेल किंवा धाब्यावर रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबत असल्याची माहिती मनोज याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis Statement : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी मौन सोडलं, खात्यांचा पदभार सोपवला

IND U19 vs SL U19 SF Live: भारत-श्रीलंका सामना रद्द झाल्यास कोण जाईल फायनलला? बांगलादेशकडून पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

Latest Marathi News Live Update : वैजापूरमध्ये बिबट्या विहिरीत अडकला

Epstein Files Explained : मोदी सरकार कोसळणार? एपस्टीन फाइल्स काय आहे, भारतातील नेते का घाबरले? संपूर्ण माहिती एका क्लिकवर...

Success Story: रामटेकच्या कार्तिक बावनकुळेचा युपीएससीत डंका; आयआयटी जमले नाही, युपीएससीला घातली गवसणी

SCROLL FOR NEXT