eknath shinde sakal media
मुंबई

आकसापोटी केंद्रीय यंत्रणांचा वापर लोकशाहीला घातक - एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावर ईडीकडून (Enforcement directorate) करण्यात आलेली कारवाई अतिशय दुर्दैवी आहे. जे दोषी असतील किंवा ज्यांनी गैरव्यवहार केले असतील तर त्यांची चौकशी करणे योग्य आहे; परंतु राजकीय आकसापोटी केंद्रीय यंत्रणांचा (central Agencies) वापर करणे योग्य नाही. आकसापोटी राजकीय यंत्रणांचा वापर लोकशाहीला घातक आहे, असे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केले.

संजय राऊत यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी आपले मत व्यक्त केले.
नागपूर ते शेलू या दोनशे दहा किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्याचे लोकार्पण एक मे महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

फडणवीसांचे श्रेय नाकारत नाही

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले, हे आम्ही नाकारत नाही. मात्र, त्या काळातही मी त्या खात्याचा मंत्री होतो. उद्धव ठाकरे यांनीदेखील माझ्यावर विश्वास टाकला होता. त्यानुसार या मार्गाचे काम सुरू करण्यात आले. सगळ्यांच्या सहकार्यातून हा रस्ता झाला असून रस्त्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT