Sahitya Sammelan sakal media
मुंबई

ठाण्यात मंगळवारपासून युवा साहित्य संमेलन; पहिल्या दिवशी साहित्य दिंडी निघणार

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : युवावर्गाला मराठी साहित्याविषयी (Marathi Literature) गोडी निर्माण व्हावी, तसेच तरुण साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मंगळवारी (ता. १२) आणि बुधवारी (ता. १३) ठाणे शहरात राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे (Yuva sahitya sammelan) आयोजन करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या (Marathi Sahitya Parishad) युवाशक्ती समितीतर्फे दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून यंदा प्रथमच ते ठाण्यातील (Dr Kashinath Ghanekar) डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडणार आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक प्रणव सखदेव असणार आहेत; तर माजी महापौर नरेश म्हस्के हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. संमेलनाचे उद्‍घाटन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

युवा साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी संमेलनस्थळाजवळून सकाळी ८ वाजता साहित्य दिंडी निघणार असून यात विविध विषयांवरील पथनाट्य, लोकनृत्य इत्यादींचे सादरीकरण होणार असून यात जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती बुधवारी कोमसापच्या दीपा ठाणेकर यांनी दिली.

राष्ट्रपतींना पत्र

साहित्य संमेलनाचा एक भाग म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, या मागणीसाठी राष्ट्रपतींना दहा हजार पत्रांचा तिसरा आणि शेवटचा बस्ता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते पाठवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT