मुंबई

मराठी माध्यम शाळांसाठी मुख्याध्यापकांची मोट

CD

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ७ : इंग्रजी माध्यम शाळांचे पेव कमालीचे फुटले आहे. भविष्यातील इंग्रजीची गरज लक्षात घेऊन पालकही आपल्या पाल्यांना मराठीऐवजी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये पाठवतात. त्याचा परिणाम मराठी शाळांच्या पटसंख्येवर होऊन अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याची दखल घेत ठाणे जिल्ह्यातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सरसावल्या आहेत. यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांतील मुख्याध्यापकांची मोट त्या बांधणार आहेत. त्यातून शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
इंग्रजी शाळांमधून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, अत्याधुनिक शैक्षणिक पद्धतीचा होणारा वापर यामुळे पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वळू लागला आहे; मात्र यामुळे मराठी शाळांची पीछेहाट होत आहे. परिणामी, या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शाळा बंददेखील पडल्या आहेत. या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यामुळे त्यांच्या समायोजनाचादेखील प्रश्न उभा ठाकला आहे.
अशा शिक्षकांचे जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये रिक्त पदे असतील त्या जागेवर समायोजन होते; अन्यथा त्यांचे इतर जिल्ह्यांमध्ये समायोजन करावे लागते. त्यामुळे शिक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील फरपट होते. मराठी शाळा बंद झाल्यास त्याचे शिक्षक, विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देण्यासाठी मुख्याध्यापकांना एकत्र केले जाणार आहे. सध्याच्या आधुनिक युगात टिकून राहण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये कोणत्या सुविधा देता येतील, शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल यावर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

शाळांचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांमध्ये परिवर्तन होणे आवश्‍यक आहे. मराठी शाळा इंग्रजी शाळांच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याबरोबरच या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण कसे देता येईल, त्याचेदेखील नियोजन कसे करावे याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
- ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी (माध्य), जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

Pune News : राज्यातील ‘या’ चार विद्यापीठांच्या अधिनियमांत सुधारणेसाठी समिती स्थापन

Pravin Darekar: 'या' महिलांना महापालिकेची कामे द्यावीत, प्रविण दरेकर यांची मागणी

Latest Marathi News Updates: राऊतांचं स्कील भल्या भल्यांना आत्मसात करता येणार नाही - आव्हाड

Tata Power: टाटाकडून मोठं गिफ्ट! तीन महिन्यात ४५ हजार घरात सौर प्रकाश

SCROLL FOR NEXT