Inflation
Inflation  Sakal
मुंबई

पालघर जिल्ह्यात महागाईचा धूर

सकाळ वृत्तसेवा

वसई : दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. गॅसचे वाढणारे दर पाहता ग्रामीण भागातील महिला चुलीवर स्वयंपाक करण्यास प्राधान्य देत आहेत; मात्र शहरात चुलीवर स्वयंपाक करणे शक्य नसल्याने शहरी भागातील महिला इलेक्ट्रिक शेगडीवर स्वयंपाक करण्यास प्राधान्य देत आहेत. सिलिंडर, तेल, कडधान्य, डाळी, बेसन, भाजीपाला, चिकन, मटण, फळे आदींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

त्यामुळे बचत कशी करायची, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
महागाईच्या झळा हॉटेल चालकांनादेखील बसत असून त्यांनीदेखील हॉटेलमधील पदार्थांचे दर वाढवले आहेत. हॉटेलमध्ये काम करणारे कामगार, देखभाल दुरुस्ती, ग्राहकांना सुविधा देण्यासाठी जाहिरात यासह अनेक खर्च व्यावसायिकांना करावे लागतात. त्यात वाढत्या महागाईने कोरोनातून सावर असलेले व्यावसायिक चिंतेत आहेत.

फिटनेससाठी लिंबू सरबत रोज पित होते; मात्र आता गरम पाणी हा पर्याय निवडला. जिथे पाच लिटर तेल वापरले जात होते ते कमी करून तीन लिटरमध्ये भागवले जाते. हॉटेलमध्ये जाणे टाळत आहोत. भाववाढ अशीच सुरू राहिली जर जगणे कठीण होईल.
गीता आयरे, गृहिणी

रमजानमध्ये फळे, चिकन, मटणचे भाव अधिक आहेत. त्यामुळे जिथे पाच प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जायचे ते कमी केले आहेत. काटकसर हाच पर्याय उरला आहे. मोठ्या कुटुंबांना महागाईचा फटका अधिक प्रमाणात बसत आहे.
- फरजाना शेख, गृहिणी

गरम पाणी, चहा, दूध तापवण्यासाठी तसेच काही प्रमाणात जेवणाकरिता इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करत आहोत. डाळीपासून तेलापर्यंत भाव वाढले आहेत. त्यामुळे पगार शिल्लक राहत नाही. भविष्याची बचतदेखील करता येत नाही.
- श्रद्धा मोरे, गृहिणी

पूर्वी आता (किमती रुपयांमध्ये)
चिकन (१ किलो) - २५० - ३६०
मटण (१ किलो) - ५०० - ७००
खजूर (१ किलो) -१०० - १५०
सफरचंद (१किलो) - १२० - २५०
एक डाळिंब (१किलो) - २० - ४०
एक लिंबू (एक) - १५
एक टरबूज (एक) ३० - ६०
तेल (एक लीटर)- १५० - २००
बेसन (१ किलो) - ७० - ११०

जिल्ह्यात चुली पेटल्या
धुराचा त्रास होऊ नये म्हणून ग्रामीण भागात सिलिंडरचा वापर होऊ लागला होता; मात्र सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे आता पूर्वीसारख्या पुन्हा पालघर जिल्ह्यात अनेक घरांत चुली पेटू लागल्या आहेत.

हॉटेलमध्ये १० टक्के दर वाढले
महागाईमुळे हॉटेल व्यावसायिकांवरदेखील संक्रांत आली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांवर १० टक्के वाढ केली आहे; तर काही ठिकाणी दर स्थिर असले तरी मात्र खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT