मुंबई

पेणमधील सात ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : पेण तालुक्यातील सात ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्या हस्ते संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले‌. बोर्जे, कांदळे, निगडे, गागोदे खुर्द, वाक्रुड, वरप, मसद बुद्रुक या ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.जानेवारी २०२३ पासून जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींनी आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. तसेच आणखी ५० ग्रामपंचायतींची आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.

शासन व्यवहारात पारदर्शकता; तसेच गतिमानता यावी, यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर्स, फॉर्मस, दस्ताऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींच्या कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मिती करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१९ मध्ये घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, स्वच्छतागृहे बांधणे, गावात साफसफाई असणे, व्यायामशाळा, स्वच्छ पाणीपुरवठा करणे, घरपट्टी-पाणीपट्टी वसुली, ग्रामसभांत नियमित विषयांवर चर्चा, गावात वृक्षारोपण करणे यांसह इतर शासकीय योजना राबवण्यावर भर देण्यात येत आहे. या सर्व बाबींकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील सातत्याने पाठपुरावा करत होते. जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना आयएसओ करण्यासाठी व्ही. एन. टेक्नो. रिसर्च प्रा. लि. कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या सर्व प्रयत्नांना यश मिळाले आहे.

मानांकन मिळालेल्या ग्रामपंचायती
जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील बोरीस गुंजीस, सातिर्जे, सारळ ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले होते. यानंतर फेब्रुवारी महिन्यात अलिबाग तालुक्यातील कामार्ली उरणमधील पुनाडे व दिघोडे; तसेच पेण तालुक्यातील उंबर्डे या चार ग्रामपंचायतींना, तर‌ मार्च महिन्यात नागाव आणि नुकतेच पेण तालुक्यातील बोर्जे, कांदळे, निगडे, गागोदे खुर्द, वाक्रुड, वरप, मसद बुद्रुक या ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT