मुंबई

मधूमेह मुक्ती सहज साध्य - डॉ. भाग्येश कुलकर्णी

CD

मधुमेहमुक्ती सहज साध्य ः डॉ. भाग्येश कुलकर्णी
कमळ नागरी पतसंस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन; तणावविरहित जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन
अलिबाग, ता. १२ : व्यायामाची सवय, जेवणातील सातत्य आणि मानसिक तणावविरहित जीवनशैलीच्या अंगीकारणाने मधुमेहापासून हमखास मुक्तता मिळते, असे मार्गदर्शन पुणे येथील रिव्हर्सल स्पेशलिस्ट तथा डायबेटीस फ्री फॉरेएव्हरचे संचालक डॉ. भाग्येश कुलकर्णी यांनी केले. रविवारी (ता. १०) कमळ पतसंस्थेच्या सहकार्याने आयोजित ‘मधुमेहमुक्त जीवन कसे ते जाणून घेऊ’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके यांच्या प्रयत्नाने व सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याचबरोबर संचालक मंडळ उपस्थित होते. या वेळी डॉ. संजीव शेटकर, डॉ. अमेय केळकर, विलास म्हात्रे, डॉ. अरविंद केळकर, डॉ. अपूर्वा कुमठेकर व डॉ. अवनी केळकर यांचा सन्मानपत्र देऊन कमळ पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कायम निरोगी राहताना दीर्घकालीन आरोग्य आणि मधुमेहापासून मुक्तता कशी करायची याबाबत भाग्येश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
भाग्येश कुलकर्णी म्हणाले की, कार्बोहायड्रेट आणि शरीरातील एनर्जी या दोन्ही गोष्टी मधुमेह वाढीसाठी कारणीभूत ठरत आहेत. यातील एक चरबी वाढणे आणि जीवनामध्ये तणाव. मधुमेह सुरुवातीला तपासणीसाठी ग्लुकोज टॉलरन्स ही टेस्ट ही महत्त्वाची असते व ती केल्यावर शुगर दीडशेच्या आत येणे हे गरजेचे असते. या वेळी मनोगतात अरविंद केळकर यांनी सांगितले की, एका कुटुंबात तीन पिढ्या नांदत असतात, प्रत्येक पिढीमध्ये जेवण, दळणवळण शारीरिक अंगमेहनतीची कामे व मानसिक ताणतणाव हे वेगाने बदलत आहे. सध्याच्या पिढीमध्ये बैठी जीवनशैली, बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय व अतिरिक्त ताणतणाव यामुळे तरुण वयातसुद्धा अनेकांना मधुमेह आढळण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वी मधुमेह रुग्ण ५० किंवा ६० नंतर आढळत होते, मात्र आता वयाच्या तिशीनंतरही आढळून येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार! बीएमसी साडेचार किमीचा नवा उड्डाणपूल बांधणार, वाचा संपूर्ण मेगाप्लॅन

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध का झाला पराभव? उपकर्णधार रिषभ पंतने सांगितली टीम इंडियाची चूक

Viral Yoga Video : छतावर योगा करत होती तरुणी, माकडाने केली हुबेहुब नक्कल; व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केली प्रशंसा

हृदयद्रावक! 'पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीनेही सोडले प्राण'; ८० वर्षे एकत्र संसार, करमाळा तालुक्यातील घटना..

Viral Video : सर्जरीनंतर अभिनेत्रीने दाखवते 825 ग्रॅमचे सिलिकॉन ब्रेस्ट, नवीन लुकवर नेटकरी म्हणाले, ‘हे तर पूर्ण बदललंय’

SCROLL FOR NEXT