मुंबई

गणवेशसाठी तीनशे रुपये

CD

तीनशे रुपयांचा गणवेश
जिल्हा परिषदेकडून निधीवाटप, पालकवर्गात नाराजी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : विद्यार्थीदशेत वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती व्यावी, यासाठी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये स्काऊटचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाकडून प्रत्येकी ३०० रुपये देऊन विद्यार्थांना स्काऊट गाईडचा गणवेश दिला जाणार आहे; परंतु सध्याची वाढती महागाई पाहता घेतलेले कपडे चांगल्या स्थितीत किती दिवस राहणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासूनच शिस्त राहावी, एक जागरूक नागरिक निर्माण व्हावे, म्हणून शालेय स्तरापासूनच वाहतुकीच्या नियमांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेबाबत गोडी निर्माण होण्यासाठी शिक्षण विभागाकडून स्काऊट वर्ग सुरू केले आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांना विशिष्ट गणवेश देण्यात येणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन हजार ५०१ शाळा आहेत. या शाळांमध्ये ८७ हजार ९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत पाच हजार ८८८ शिक्षक असून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी दप्तराविना शाळासारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच बौद्धिक व शारीरिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातील स्काऊट गणवेश हा उपक्रम आहे. गेल्या वर्षी हा उपक्रम जाहीर करण्यात आला; परंतु विद्यार्थ्यांपर्यंत स्काऊटचे कपडेच पोहोचले नाहीत, त्यामुळे ही योजना बारगळली होती; पण आता कपड्यांऐवजी थेट गणवेशासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
----
अडीच कोटींचा निधी वर्ग
अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्ग व सर्वसाधारण मुलांसह सर्व वर्गातील मुली अशा एकून ९८ हजार ५७२ विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपयांप्रमाणे दोन कोटी ५७ लाख एक हजार ६०० रुपयांचा निधी शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला पाठवला. हा निधी ऑगस्टमध्ये तालुकास्तरावर वितरित करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
----
विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण करण्यासाठी स्काऊटचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचे जिल्हाभरातून स्वागत करण्यात आले; परंतु स्काऊटच्या गणवेशासाठी लागणारे अनुदान तुटपुंजे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
----
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित गणवेशासह स्काऊट गाईड गणवेशासाठी अनुदान वितरित करण्यात आले आहे. तालुक्याला निधी वर्ग करण्यात आला आहे. गणवेश शिवण्यासाठी शिक्षण विभागाने कोणत्याही बचत गटासह ठेकेदाराकडे काम दिलेले नाही. कामात पारदर्शकता निर्माण व्हावी म्हणून थेट शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी देण्याच्या सूचना केल्या आहेत.
- ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT