मुंबई

रायगडमधील तिघा शिक्षकांचा गौरव

CD

रायगडमधील तिघा शिक्षकांचा गौरव
राज्‍यस्तरीय पुरस्‍कारासाठी जिल्ह्यातून निवड
अलिबाग, ता. २० : राज्‍याच्‍या शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या क्रांतिज्‍योती सावित्रीबाई फुले राज्‍य शिक्षक गुणगौरव पुरस्‍कारात रायगड जिल्ह्यातील तीन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी राज्‍यभरातून १०९ शिक्षकांची निवड झाली आहे. मुंबईत मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत सोमवारी (ता. २२) या पुरस्‍कारांचे वितरण होणार आहे.
मानसी भोसले ः
पनवेल तालुक्‍यातील सांगुर्ली प्राथमिक शाळेच्‍या शिक्षिका वि‍विध शैक्षणिक उपक्रमांतून पाच वर्षांत शाळेची पटसंख्‍या ४२ टक्‍क्‍यांनी वाढवली. समाजमाध्‍यमांचा वापर करून शैक्षणिक साहित्‍यनिर्मिती करीत नवोपक्रम स्‍पर्धेत जिल्‍हास्‍तरावर तिसरा क्रमांक मिळवला. दानशूर व्‍यक्‍ती आणि सामाजिक संस्‍था यांच्‍या मदतीतून शाळेत भौतिक सुविधा आणि विद्यार्थांना शैक्षणिक साहित्‍य उपलब्‍ध करून देण्‍यात मानसी भोसले यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. या शाळेतील विद्यार्थ्‍यांनी विविध स्‍पर्धांमध्‍ये यश मिळवले आहे.
सतीश घावट ः
आदिवासी विभागासाठीच्या पुरस्‍कारात कर्जत तालुक्‍यातील झुगेरवाडी येथील जिल्‍हा परीषदेच्‍या उच्‍च प्राथमिक शाळेचे शिक्षक सतीश घावट यांची निवड झाली आहे. शिष्‍यवृत्ती तसेच स्‍पर्धा परीक्षेत या शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थी प्रतिकृती मार्गदर्शक म्‍हणून त्‍यांनी राज्‍यस्‍तरावर प्रतिनिधित्‍व केले आहे. कोरोना काळात व्हिडिओ निर्मिती स्‍पर्धेत सहभाग घेतला. या शाळेस मुख्‍यमंत्री सुंदर शाळा स्‍पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला आहे. घावट यांनी तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करतानाच कृतीयुक्‍त शिक्षणावर भर दिला.
अपूर्वा जंगम ः
माणगाव तालुक्‍यातील कशेणे येथील जिल्‍हा परिषद शाळेच्‍या शिक्षिका अपूर्वा जंगम यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्‍कार जाहीर झाला आहे. गेल्‍यावर्षी राज्‍य रंगोत्‍सवात त्‍यांच्‍या आठ विद्यार्थ्‍यांना राज्‍यस्‍तरावर सादरीकरणाची संधी मिळाली. महाराष्‍ट्र राज्‍य शैक्षणिक संशोधन परीषदेतील अभ्‍यासक्रम निर्मितीत सहभाग, इंग्रजी बीजकोष निर्मिती सहभाग, बालभारती वेबसाईटवर शैक्षणिक व्हिडिओ आहेत. निपुण भारत उपक्रमांतील विविध स्‍पर्धांमध्‍ये त्‍यांनी यश संपादन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: गोट्या गित्तेचा मकोका का रद्द झाला? जबाबदार कोण? जाणून घ्या सविस्तर...

GST Council: सणासुदीला नागरिकांना दिलासा! जीएसटी कपात जाहीर, २२ सप्टेंबरपासून 'इतका' कर आकारला जाणार

Nilanga News : निलंगा परिसरात विजांचा कडकडाट; एका महिलेसह चार जनावरे दगावली

INDW vs AUSW: स्मृती मानधनाने झळकावले वेगवान शतक, ऑस्ट्रेलियाच्या ४०० पार धावांसमोर जिद्दीने उभी राहिली; १४ चौकार, ४ षटकारांची आतषबाजी

Latest Marathi News Live Update : अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

SCROLL FOR NEXT