मुंबई

रस्त्यांची कामे अपूर्णच

CD

रस्त्यांची कामे अपूर्णच
प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना, खासदार तटकरेंचा संताप
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. यासाठी निधी उपलब्ध करूनही ही कामे रखडलेली असल्याने रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. प्रशासकीय दिरंगाईचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्याने खा. तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करताना अपूर्ण असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा नियोजन भवन हॉल येथे आयोजित विविध विषयांच्या आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील विकासकामांबद्दल बुधवार (ता. १) रोजी जिल्हा नियोजन भवनमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आरोग्य, शिक्षण आणि प्रामुख्याने रस्त्यांची दुरुस्ती या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उप वनसंरक्षक अलिबाग राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) रवींद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी सत्यजित बडे आदी उपस्थित होते. रखडलेल्या कामांबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनीही कामांबद्दल नाराजी व्यक्त करताना निविदा भरूनही कामे करण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा पाठविण्याच्या सूचना केल्या.

चौकट
शिवरायांच्या स्मारकासाठी ७० लाख
मुरूड नगर परिषदेच्या हद्दीत छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी ७० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यासाठी जागाही उपलब्ध करून दिलेली आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष घालण्याच्या सूचना खा. सुनील तटकरे यांनी या वेळी नगरपालिका प्रशासनाला केल्या.

चौकट
रखडलेल्या कामांबद्दल सूचना
वडखळ-अलिबाग रस्त्याचे काम, बेलकडेमार्गे अलिबाग-रोहा रस्त्याची प्रलंबित असलेली कामे तसेच रस्त्यावरील खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.
राजेवाडी ते म्हाप्रळ या नॅशनल हायवेच्या कामामध्ये काही अडी-अडचणी असतील तर त्या सोडवून ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
मुंबई-गोवा हायवेवरील इंदापूर व माणगाव येथील बायपासची कामेही सुरू करावीत.
नातेखिंड ते रायगड या मार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर द्यावा.
मुरूड तालुक्यातील साळाव ते मुरूड रस्ता तसेच रोहा ते आगरदांडा रस्त्याची कामे पूर्ण करावीत.
# भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे कृषी अधिकारी व तलाठी यांनी संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ''एवढ्या फास्ट रंग बदलणारा सरडा..'' फडणवीसांच्या लोकप्रियतेवरुन केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

Mumbai News: प्रश्न‍पत्रिका तपासणीच्या निकषांमध्ये बदल, शिक्षणात नवीन कार्यपद्धतीचे आदेश; कुणाला लागू होणार?

Eknath Shinde : केंद्राने राज्याला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यादीच वाचून दाखवली

आर्थिक फायदा; पण सुरक्षेवर ताण येणार! दुकाने २४ तास खुली ठेवण्याचा सरकारचा प्रयोग किती यशस्वी ठरणार? वाचा पडद्यामागचं गणित

Barshi News : बार्शीच्या श्री भगवंत देवस्थानकडून शेतकऱ्यांसाठी १० लाखांचा मदतनिधी; मुख्यमंत्री सहायता निधीकडे धनादेश सुपूर्द

SCROLL FOR NEXT