मुंबई

ऐतिहासिक विजयाचा कुंभारघरात जल्लोष

CD

ऐतिहासिक विजयाचा कुंभारघरात जल्लोष
प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या यशाचे ग्रामस्थांना कौतुक
पाली, ता. ४ (वार्ताहर)ः महिला विश्वचषक जिंकवण्यात संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, मुजुमदार यांच्या रायगड जिल्ह्यातील कुंभारघर या मूळगावीदेखील विजयाचा जल्लोष सुरू आहे.
सुधागड तालुक्यातील कुंभारघर अमोल मुजुमदार यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील अनिल मुजुमदार तसेच त्यांच्या वडिलांचे वडील प्रभाकर मुजुमदार आणि त्यांचे पूर्वज हे मूळचे कुंभारघर येथीलच आहेत. कुंभारघर येथे त्यांचे वडिलोपार्जित घर, जागा आहे. तसेच जांभूळपाडा येथे त्यांचा फार्महाउससुद्धा आहे. अमोल मुजुमदार परिवारासह नियमित या ठिकाणी येत असतात. त्याचबरोबर गावातील देवीच्या उत्सवासाठी तसेच सुधागड किल्ल्यावरील भोराई मातेच्या उत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. जगभर नावाजलेले अमोल मुजुमदार यांनी गावाबरोबर येथील लोकांसोबतची नाळ कायम ठेवली आहे. सुधागड तालुक्यातील प्रकाश देसाई यांच्यामार्फत राजयोगी मित्र मंडळाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेलादेखील अमोलने उपस्थिती लावली होती. त्यामुळे रायगडच्या सुपुत्राने मिळवलेल्या यशाने कुंभारघर ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
-------------------------------------------------
शुभेच्छांचा वर्षाव
समाजमाध्यमांवर स्थानिक नागरिक अमोल मुजुमदार यांना शुभेच्छा देत आहेत. अमोल मुजुमदार रायगडचे सुपुत्र असल्याचे कळाल्यानंतर अनेक जण फोन करून विचारणा करत असल्याचे अमित मुजुमदार यांनी सांगितले, तर भारतासह रायगड जिल्हा, सुधागड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्याचे काम अमोलने केल्याचे कौतुक असल्याचे चुलत काका अमित मुजुमदार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT