मुंबई

तीन जनावरांचा बिबट्याकडून फडशा

CD

तीन जनावरांचा बिबट्याकडून फडशा
सुधागत तालुक्यातील नागशेत, कोशिंबळेत वावर
पाली, ता. २७ (वार्ताहर)ः सुधागड तालुक्यात नागशेत, कोशिंबळे परिसरातील तीन जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या प्रकाराने दाट जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत नरभक्षक बिबट्याचे हल्ले सुरू आहेत. शेतकरी, ग्रामस्थ तसेच शाळकरी मुलांनी जीव गमावल्याने दहशतीचे वातावरण आहे. अशातच सुधागड तालुक्यातही बिबट्याने दोन दुभत्या गाई, एका वासराचा बळी घेतला. यापूर्वीही याच परिसरात म्हशीला ठार मारल्याची घटना नोंदवली होती. जंगलाच्या कडेला असलेल्या परिसरात बिबट्याच्या दर्शनामुळे ग्रामस्थांवर रात्रभर जागरण करण्याची वेळ आली आहे.
----------------------------------
भरपाईसाठी प्रस्ताव
जनावरांवरील हल्ल्याच्या घटनेनंतर शेतकऱ्यांनी वन विभागाला कळविले. त्यानंतर सुधागड वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे, वन्यजीव परिक्षेत्र अधिकारी उमेश जंगम, अनुभवी वनपाल उत्तम किसनराव शिंदे, वनरक्षक समाधान कुटे, पाच्छापूर वनरक्षक सायली महाडिक, पशुधन अधिकारी म्हसकर आणि नांदगाव विभागीय पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच संबंधित कागदपत्रांसह भरपाईचा प्रस्ताव अलिबाग वन विभागाकडे पाठविला आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांनुसार लवकरच भरपाई मिळणार आहे.
-----------------------------------
वन विभागाकडून गस्त
बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात वन विभागाचे कर्मचारी नियमित गस्त घालत आहेत. जनावरांच्या संरक्षणासाठी गुरांना बिल्ले (टॅग) लावावेत, असे आवाहन वन विभागाने केले आहे. रात्री विनाकारण घराबाहेर न जाणे, जनावरे सुरक्षित जागी बांधणे, जंगलाच्या कडेला एकटे जाणे टाळणे, त्वरित वन विभागाला कळविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सरकारी नियमांनुसार हल्ला झाल्यास भरपाई मिळणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Paper Leak : 'टीईटी' पेपर फुटला! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर, विद्यार्थ्यांकडून कबुली; २६ संशयितांची नावे निष्पन्‍न...

Bribery Action: 'महाबळेश्वरमध्ये विस्तार अधिकारी, ऑपरेटर लाचलुचपतच्या जाळ्यात'; सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ, १५ हजार मागितले अन्..

मोठी बातमी! लग्नाच्या वरातीसाठी घ्यावी लागणार पोलिसांची परवानगी; रात्री दहानंतर कोणी मोठ्या आवाजाचा साऊंड लावला तर ‘या’ क्रमांकावर करता येईल तक्रार

आजचे राशिभविष्य - 28 नोव्हेंबर 2025

वीकेंडला नाश्त्यात 'Spicy Paneer Roti Tacos' ट्राय केलय का? सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT