मुंबई

बळीराजावर संकटांची मालिका

CD

बळीराजावर संकटांची मालिका
वातावरणीय बदलाने वालाच्या उत्पादनावर परिणाम
पाली, ता. १५ (वार्ताहर)ः अवकाळी पावसाने खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले भाताचे उत्पादन शेतकऱ्याकडून हिरावून घेतले. त्यानंतर रब्बी हंगामात भाजीपाला लागवड, कडधान्याची नासाडी केली आहे. अशातच आता गुलाबी थंडीने कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याचे चित्र रायगड जिल्ह्यात येत आहे. आतापर्यंत वालाच्या शेंगांचे उत्पादन झालेले नाही. परिणामी, बळीराजा चिंतातूर असून, विक्रेते हवालदिल आहेत.
जिल्ह्यात रब्बी हंगामात सर्वात जास्त जवळपास ४,३८१ हेक्टर वालाची लागवड केली जाते. जिल्ह्यात निडी येथील वाल प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे वालाच्या शेंगाप्रेमींना ग्रामीण भागातील गावठी वालाच्या शेंगांना इतर जिल्ह्यातूनही मागणी असते, मात्र गावठी वालासाठी वाट पहावी लागणार आहे. दोन तीन वर्षांपूर्वी वालाच्या शेंगांची आवक मार्गशिषपासून होत होती, मात्र अवकाळी पाऊस, प्रतिकूल हवामान, वातावरणामुळे गावठी वालाच्या शेंगांचे उत्पादन लांबणीवर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडमधील भाजीपाला बाजारातील उपलब्ध असलेल्या वालाच्या शेंगा पुणे, इतर बाहेरील जिल्ह्यातून येत असल्याचे राजेश फोंडे या पालीतील भाजीविक्रेत्याने सांगितले.
----------------------------------
पिकांची वाढ मंदावली
- थंडीच्या दिवसात पोपटीच्या माध्यमातून गावठी शेंगांच्या चवीचा आस्वाद घेता येत नाही. गावठी शेंगांची पारख असलेल्या ग्राहकांचा हिरमोड होतो. ग्राहक बाजारात येणाऱ्या शेंगा खरेदी करण्यास कानाडोळा करत असून, गावठी शेंगांच्या प्रतीक्षेत आहे.
- खरीप पिकांपैकी भातकापणीस विलंब झाला होता. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील कडधान्य पिकांच्या पेरणीवर झाला. वाल, कडधान्यांवर हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. ओलावा, सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पिकांची वाढ मंदावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Cold Wave : महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरणार? हवामान विभागाचा असा असेल पुढील अंदाज

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा प्रयत्न

Sangli Politics : 'महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार'; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांची मोठी घोषणा

माेठी बातमी! सातारा जिल्ह्यातील ड्रग्‍ज प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे?; विशाल मोरेसह सात जणांना अटक, कोण आहे सलीम डोला?

Railway : पुणे-मुंबई-पुणेची ‘प्रतीक्षा’ संपली; लोणावळ्यात लोहमार्गाचे विस्तारीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT