मुंबई

ए भावा कुणाची हवा

CD

ए भावा कुणाची हवा
मतदान संपले, पण उत्सुकता शिगेला ः सामाजिक माध्यम व पारावर चर्चांना उधाण
पाली, ता. ८ (वार्ताहर) ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी शनिवारी (ता. ७) संपली. मात्र, मतदान झाल्यानंतर निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. आपलाच उमेदवार कसा निवडून येणार याबाबत सामाजिक माध्यम व पारावर चर्चांना उधाण आले आहे. सामाजिक माध्यमांवर तर वाकयुद्ध सुरू झाले आहे.
रायगड जिल्ह्यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले. रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांतील १७३ उमेदवार आणि १५ पंचायत समित्यांमधील ३२९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. एका दिवसाच्या खंडानंतर निकाल असल्याने अनेक जण गावच्या पारावर आणि सामाजिक माध्यमांवर मतांची आकडेमोड करताना दिसले. काही कार्यकर्ते गावात, समाज मंदिर आणि पारावर पक्ष कार्यालयात जमून आपल्या उमेदवाराला किती मते मिळणार याचा अंदाज घेत होते. काहींनी रविवारी (ता. ८) आराम करण्याचा निर्धार केला आहे. कार्यकर्ता निखिल खैरे याने गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारासाठी फिरत होतो. त्यामुळे जरा थकलो आहे. मात्र, अजूनही आराम नाही. सध्या आमच्या उमेदवाराच्या निकालाची उत्सुकता आहे. आमचा उमेदवार निवडून येणार याची खात्री आहे, असे सांगितले.

हॉटेल व ढाब्यावर गर्दी
निवडणूक मतदान प्रक्रिया संपल्यावर शनिवारी आणि रविवारी बहुतांश कार्यकर्त्यांनी रात्री हॉटेल व ढाब्यावर गर्दी केली होती. शिवाय गाव-खेड्यातील छोटे-मोठे हॉटेलदेखील कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरली होती. यामुळे हॉटेल व ढाबेवाल्यांचा व्यवसाय चांगला झाला. परतीचे मतदारदेखील काही प्रमाणात येथे थांबले होते.

सामाजिक माध्यमांवर चर्चांना उधाण
सामाजिक माध्यमांवर मतदारसंघात कोण जिंकणार व कोणाला किती मते मिळतील याचा अंदाज मांडला जात आहे. कुठे कोणता उमेदवार वरचढ आहे. कुठे कोणाला फटका बसेल, याचा एकूण आढावा घेतला जात आहेत. अनेक जण या पोस्टवर साधकबाधक प्रतिक्रियासुद्धा देत आहेत.

आमच्या पक्षाच्या व महायुतीच्या उमेदवारांना चांगले मतदान झाले आहे. नेत्यांचे योग्य मार्गदर्शन व व्यूहरचना आणि सर्वांनी केलेले नियोजनबद्ध काम यामुळे यशाची खात्री आहे. कार्यकर्त्यांनी मन लावून खूप प्रचार केला असल्याने यश हमखास मिळणार. त्यामुळे आता निर्धास्त आहोत. फक्त निकालाची उत्सुकता आहे.
- सुशील शिंदे, शहरप्रमुख, भाजप, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्ह्यात तालुकानिहाय गटनिहाय आघाड्यांचे चित्र स्पष्ट

Kolhapur ZP : रिल्स स्टार काँग्रेस उमेदवार सोनाली सावंत विजयी, शिरोळमध्ये राजू शेट्टींनी खाते उघडले, गणपतराव पाटील, यड्रावकर गटासोबत जोरदार चुरस

Sindhudurg ZP Results : माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात अपक्षांचा झेंडा; महायुतीच्या उमेदवारांना मोठा धक्का, जिल्ह्यातील सत्तासमीकरणे बदलणार

Solapur Zilla Parishad Results : सोलापूर जिल्हा परिषदेतील पहिला निकाल हाती, राष्ट्रवादीच्या वाघिणीने इतिहास घडवला, आश्विनी दळवी यांचा विजय

Sindhudurg ZP Results : भाजपने कोकणात उघडले विजयाचे खाते; कणकवलीत राजेश जाधव ९४८ मतांनी विजयी, काँग्रेसचे उमेदवार प्रवीण वरूणकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT