मुंबई

सासू-सुना विजयी

CD

सासू-सुना विजयी
अलिबागमध्ये घराणेशाहीला मतदारांचा कौल
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : जिल्हा परिषद निवडणुकीत अलिबागमध्ये घराणेशाहीला मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कुटुंबातील दोन उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत सासू-सुनेची जोडी विजयी ठरली. थळ आणि चेंढरे या दोन्ही मतदारसंघांतील निकालांनी स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषदेच्या चेंढरे गटातून आदिती नाईक-दळवी यांनी तब्बल पाच हजार ५५ मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रविणा घासे यांचा पराभव केला. या मतदारसंघात ५७७ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. आदिती नाईक-दळवी यांच्या विजयामुळे शिवसेनेचे वर्चस्व या भागात अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, थळ मतदारसंघातून आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी सहा हजार ४६९ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शेकापच्या सानिका घरत यांचा पराभव करत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात ठेवला. या दुहेरी विजयामुळे अलिबागमध्ये दळवी कुटुंबाचा राजकीय प्रभाव अधोरेखित झाला असून घराणेशाहीला मतदारांचा पाठिंबा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी काळात या निकालांचे स्थानिक राजकारणावर परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Service Close : मोठी बातमी! युपीआय सेवा ठप्प; लाखो व्यवहार रखडले

Amravati Student Scholarship Issue : अमरावतीमध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर गंडांतर ; महाविद्यालयांचा हलगर्जीपणा नडणार!

Arjun Tendulkar Wedding: अर्जुनच्या लग्नासाठी PM मोदीनांही आमंत्रण; स्वत: वरबाप सचिन तेंडुलकरने केली पोस्ट

T20 World Cup: न्यूझीलंडच्या सलमीवीरांनी वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकला सामना; स्पर्धेत्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT