Mumbai Pune Express Way sakal
मुंबई

Mumbai Pune Expess Way: आडोशी गावाच्या हद्दीत झाला भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू!

CD

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी पहाटे टेम्पोने समोरील वाहनाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोमधील चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. (khopoli Accident)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन जाणारा टेम्पो बोरघाटातील आडोशी गावाच्या हद्दीत आला असता चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने समोरील अज्ञात वाहनाला धडकला. या भीषण अपघातात टेम्पोची केबिन पूर्णपणे दबली गेली. यामध्ये चालक अनिल लाखन गावीत (वय २७) आणि क्लिनर अनिकेत बोरसा (वय२४) रा. सिल्वास, दादर नगर हवेली यांचा जागीच मृत्यू झाला. (mumbai pune express way)

या अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, मृत्युंजय देवदूत, बोरघाट वाहतूक पोलिस यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी बचाव पथकाने केबिनमधे अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढले. या अपघातातील ज्या वाहनाला धडक बसली तो वाहनचालक या अपघाताची माहिती न देता पळून गेल्याने खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा शोध पोलिस घेत आहेत.(odishi viilage mumbai)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

महावितरणचा दरवाढीचा शॉक! वीज होणार महाग, प्रति युनिट 'इतके' पैसे द्यावे लागणार जास्त

मला डावललं गेलं, मी फोन केले तरीही... अभिनेत्याने सांगितलं 'पारू' मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाला- त्यांनी मला...

Cough Syrup For Kids: लहान मुलांना कफ सिरप देताय? थांबा...ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा

"तू महाराष्ट्राचा बिहार केलास.." मराठी अभिनेत्याचे गौतमी पाटीलला खडेबोल "साधी माणुसकी.."

SCROLL FOR NEXT