मुंबई

समाजातील विविध घटकांवर लक्ष

CD

महाड, ता. २९ (बातमीदार) : रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून विविध समाजसह प्रत्‍येक घटकातील मतदारांवर राजकीय पक्षांकडून लक्ष केंद्रित करण्यात आल्‍याचे चित्र आहे. त्या दृष्टीने प्रचार सभा व बैठका घेतल्या जात आहेत.
रायगडमध्ये इंडिया आघाडीकडून अनंत गीते तर महायुतीकडून सुनील तटकरे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. गीते सहा वेळा या मतदारसंघातून खासदार झाले आहे, तर गत निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता राजकीय उलथापालथीमुळे दोन्ही पक्षांची ध्येयधोरणे बदलली आहेत. त्‍यामुळे दोन्ही उमेदवार नव्या दमाने प्रचाराला उतरले आहेत.
गाव बैठका, जाहीर सभा, मेळावे अशा प्रचाराच्या फेऱ्या झाल्यानंतर आता विविध समाज व त्‍यातील घटकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या सभा व बैठकाचे नियोजन करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये राजस्थानी, गुजराती, मारवाडी, पटेल हा बाहेरील जिल्ह्यातील व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात स्थिरस्थावर झाला आहे. ही मते आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्‍नात उमेदवार आहेत.
जिल्ह्यातील डॉक्टर्स, वकील, व्यापारी वर्ग, शिक्षक वर्ग, मुंबईमध्ये वास्तव्यास असलेला चाकरमानी, विविध गावातील मुंबई मंडळे, विविध ज्ञाती समाजबांधवांच्या बैठका घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी सभांचे आयोजन केले जात आहे. या मतदारसंघांमध्ये कुणबी व मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असल्याने त्‍यांच्या बहुवस्तीत प्रचार सभांवर तसेच बैठका व घरभेटींवर उमेदवार भर देत आहे.

प्रत्‍येक मत महत्त्‍वाचे
लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये एक एक मत महत्त्वाचे आहे, हा विचार करून समाजातील कोणताही एक घटक प्रचारापासून दूर राहू नये, याची खबरदारी उमेदवारांकडून तसेच पक्षांकडून घेतली जात असल्याचे दिसत आहे.
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CET Exam 2026: ‘सीईटी’चे प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर,पाहा कोणत्या दिवशी कोणती परीक्षा?

लग्नाच्या काही तास आधी अपघात, मुहूर्त चुकू नये रुग्णालयातच लग्नाचा निर्णय; कसा पार पडला सोहळा? पाहा VIDEO

Latest Marathi News Live Update : माहिमधील शाही वाडी परिसरात आग

Smriti Mandhana Wedding : स्मृती मानधनाच्या गालावर लागली सांगलीची हळद, फार्म हाऊसमधील लग्नाचे शाही व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणालं...

गडकरी साहेब पैसे पडून आहेत तर काम का होत नाही? नवले पुलावर स्थानिकांनी केला NHAIचा दशक्रियाविधी

SCROLL FOR NEXT