मुंबई

नवदुर्गेच्या आगमनाचा आज सोहळा

CD

नवदुर्गेच्या आगमनाचा आज सोहळा
बाजारपेठांमध्ये दांडिया, पोशाखांचे मुख्य आकर्षण
महाड, ता. २० (बातमीदार) : नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत असल्याने जिल्ह्यात उत्साह संचारला आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. उत्सवाचे आकर्षण वाढण्यासाठी दांडिया, रास गरब्याच्या वस्तू तसेच आकर्षक पोषकांसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्रामदेवतांची मंदिरे, देवस्थाने रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रीत ग्रामदेवतेसह परिसरातील देवींची खणानारळाने ओटी भरण्याची प्रथा असल्याने मंदिरे, मंडळांचा परिसर गजबजला आहे. जिल्ह्यामध्ये एक हजार ११५ ठिकाणी देवीची मूर्ती, खासगी १८१ ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. सिंहावरील, कमळाच्या फुलातील तसेच उभ्या मूर्तींना भक्तांची पसंती आहे. जिल्ह्यात सार्वजनिक १९५, खासगी एक हजार ४४५ ठिकाणी घटस्थापना केली जाणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाशी निगडित विविध वस्तू गुजरात, मुंबई येथून बाजारात येत आहेत.
.....
आनंदाला अधिक प्राधान्य
रायगडात नवरात्रोत्सवासाठी पारंपरिक लाकडी टिपऱ्यांसह दांडियाचे ३५ प्रकार बाजारात आले असून दोन रंग, नवरंग, सॅटिन, बेरिंग, अ‍ॅक्रेलिक, चुनरी, गोल्डन, सिल्व्हर, डायमंड, शंखेला, स्टिल घुंगरू, मेटल चुनरी, बांधणी, गोंडावाला डिस्को, तीन रंगाना अधिक मागणी आहे. दांडियांचे दर ४० ते २०० रुपयांपर्यंत असल्याने पैशांपेक्षा आनंदाला अधिक प्राधान्य ग्राहकांनी दिले आहे.
-----------------------
नऊ दिवस नऊ रंग
नवरात्रीत नवरंगाचा प्रभाव असल्याने प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगानुसार, पोषाख निवड, त्यावर मॅचिंग होणारे टिकली, कानातले, बांगड्यासाठी खरेदी सुरू झाली आहे. धोती, राजस्थानी पोहराव, कुर्ता, धोती व फेटा, जॅकेट, चनियाचोली अशा पोषाखांचे सेट आले आहेत. नऊ दिवस विविध रंगांची साडी, पोषाखावर भर दिला जात असल्याने रंगांची जमवाजमवही सुरू झाली आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हुन अधिक चित्रपटात केलंय काम

Airport Bomb: धक्कादायक! डब्लिन विमानतळ बॉम्ब आढळला, टर्मिनल २ रिकामे केले, घटनेने खळबळ

Gotya Gitte: गोट्या गित्तेचा मकोका का रद्द झाला? जबाबदार कोण? जाणून घ्या सविस्तर...

Washi News : जनकापूर ग्रामस्थाचे मांजरा नदीपात्रात दिवसभर जलसमाधी आंदोलन

Latest Marathi News Live Update : अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

SCROLL FOR NEXT