वीज देयकांमुळे दमछाक
महाड तालुक्यात महावितरणची १३ कोटींची थकबाकी
महाड, ता. २१ (बातमीदार) : तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठ्याकरिता वीज देयकांची थकबाकी १३ कोटींवर गेली आहे; पण पाणीपट्टी, इतर कर वसुलीतील अपयशामुळे देयकांची रक्कम भरण्यासाठी ग्रामपंचायतींची दमछाक होत आहे.
ग्रामीण भागामध्ये दिवाबत्तीची सुविधा झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा योजना, घरोघरी नळ कार्यान्वित झाले आहेत; पण त्या तुलनेत पाणीपट्टी तसेच अन्य कर वसुलीत ग्रामपंचायतींना अपयश आले आहे. अशातच दिवाबत्तीसाठी जिल्हा परिषदेमार्फत वितरित होणारे अनुदान वेळेत उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायतींना सर्व खर्च भागवावा लागत आहे. अनेक घरे बंद असून ग्रामस्थ मुंबईमध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींपुढे मोठा आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे.
-------------------------------------
पथदिवे ः
विभाग थकीत रक्कम
बिरवाडी - एक कोटी ३४ लाख ४७ हजार
कुंबळे-गोरेगाव - ६५ लाख ७८ हजार ६७२
महाड ग्रामीण - एक कोटी ६६ लाख ३४ हजार ६४७
महाड शहर - २५ ग्राहक एक कोटी ३० लाख
एमआयडीसी गोरेगाव - ८४ लाख ६१ हजार ४४०
नाते - एक कोटी ६६ लाख
वहूर - एक कोटी ३९ लाख
विन्धेरे - दोन कोटी ७५ लाख ५४ हजार
थकबाकी - नऊ कोटी ४१ लाख ७६ हजार
-----------------------------------------------
पाणीपुरवठा ः
विभाग थकीत रक्कम
बिरवाडी - एक कोटी २५ लाख
कुंबळे - ७२ लाख ६२ हजार
महाड ग्रामीण - ९२ लाख ९९ हजार
महाड शहर - १२ लाख
एमआयडीसी गोरेगाव - सहा लाख २३ हजार
नाते - ४० लाख ७१ हजार १४२
वहूर - तीन लाख ८१ हजार
विन्हेरे - नऊ लाख ९२ हजार ५३८
एकूण - तीन कोटी ६३ लाख
........
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती कमी लोकसंख्येच्या आहेत. त्यातच गावामध्ये राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. शासनाकडून कोणतेही स्वतंत्र अनुदान येत नसल्याने ग्रामपंचायतींना स्वतःच्या खर्चातून हे सर्व भागवणे अवघड झाले आहे.
- सुनील जाधव, माजी सरपंच, गोठे ग्रामपंचायत
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.