मुंबई

आद्यशक्तीचे पंचमुखी रुप

CD

आद्यशक्तीचे पंचमुखी रूप
गोरेगावातील गायत्री देवीचे मंदिर श्रद्धास्थान
सुनील पाटकर, महाड
वेदमाता, वेदांची जननी असलेल्या गायत्रीदेवीची मंदिरे देशांमध्ये दुर्मिळ आहेत. त्यापैकी पंचमुखी मूर्ती असलेले एक मंदिर रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे आहे. १२१ वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवात गर्दी असते.
-----------------------------
आद्यशक्ती प्रकृतीच्या पाच स्वरूपांपैकी गायत्रीदेवी मानली जाते. देवीची एकमुखी अथवा त्रिमुखी मूर्ती ठिकाणी पाहावयास मिळतात; परंतु मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे येथून तीन किलोमीटर अंतरावरील गोरेगाव येथे पंचमुखी गायत्रीची मूर्ती पाहावयास मिळते. देशातील ही एकमेव पंचमुखी मूर्ती असावी, असा अंदाज आहे. येथील देवी शक्ती, बुद्धीची दात्री असल्याचे मान्यता आहे. या मंदिराला १२१ वर्षे पूर्ण झाली असली तरी मंदिराचे लाकडी बांधकाम सुस्थितीत आहे. मंदिरासमोर प्राचीन दीपमाळा आहे. देव कोष्टकामध्ये पोवळे रत्नात घडविलेली लहान गणेशमूर्ती आहे. या दीपमाळेवर १२१ वर्षांपूर्वीचा संगमरवरी शिलालेख पाहावयास मिळतो. इतिहास व मूर्ती अभ्यासकांसाठी मूर्ती, देवालय एक पर्वणीच आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. संपूर्ण सागवानी लाकडाचे दुमजली मंदिर आहे. मंदिरातील लाकडी कलाकृती मंदिराची शोभा आणखी वाढवतात. गर्भगृहामध्ये वज्रपीठावर गायत्री देवीची पंचमुखी व दशभूजा असलेली मूर्ती आहे. जयपूर येथून ही मूर्ती आणण्यात आली होती.
------------------------------
देवीची पाच रूपे
कमळाच्या फुलावर पूर्वाभिमुख आसनस्थ देवीची मूर्ती आहे. पंचमुखांपैकी मध्यभागी असलेले मुख गायत्री देवीचे आहे. उजवीकडील पहिले केशरी वर्णमुख गणेश स्वरूपातील आहे. दुसरे मौतिक वर्णमुख सूर्य स्वरूपाचे आहे. डावीकडील पहिल्या नील वर्ण मुखात देवी यम स्वरूपात आहे. तर दुसऱ्या शुभ्रवर्णमुखात देवी विष्णू स्वरूपात आहे. या देवीच्या हातात पाश, अंकुश, शंखचक्र, सूत्रबंद, कपाल अशी शस्त्रे पाहायला मिळतात. देवीचा एक हात अभय मुद्रेत तर एक वरदायी मुद्रेमध्ये आहे.
----------------------------------------------
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
रोज सकाळी देवीची विधिवत पूजा केली जाते. नवरात्रोत्सवामध्ये या ठिकाणी मोठा उत्सव साजरा होतो. या दहा दिवसांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ व महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होतात. स्थानिक भाविकांप्रमाणेच रायगड जिल्ह्यातून तसेच इतर जिल्ह्यांतून हजारो भाविक गायत्री देवीची मूर्ती पाहण्यासाठी येत असतात. या मंदिरात वेगवेगळी कला शिबिरे, अभ्यास वर्ग होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Veer Sharma: दुर्दैवी! फ्लॅटमध्ये आग लागली अन्...; टीव्हीवरील प्रसिद्ध बाल कलाकार आणि त्याच्या भावाचा मृत्यू, सिनेक्षेत्रात हळहळ

Vikas Lawande: यशवंत कारखान्याबाबत सरकारचा दुजाभाव: विकास लवांडेंचा आरोप; 'यशवंत'च्या वार्षिक सभेत पुन्हा गोंधळ; पाच मिनिटात गुंढाळला गाशा

Sakal Relief Fund: पुरग्रस्तांसाठी जुनी सांगवीतील श्री अय्यपा स्वामी मंदिर समितीतर्फे मदतीचा हात; सकाळ रिलीफ फंडात १ लाख ५१ हजारांची मदत

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! मुख्यमंत्र्यांकडून मदत कार्याचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या विशेष सूचना

IND vs PAK Final: अर्शदीप सिंगच्या 'हातवाऱ्याने' पाकिस्तानींच्या बुडाला लागली आग; ICC कडे केली तक्रार, म्हणतात...

SCROLL FOR NEXT