मुंबई

रायगडमध्ये ''महायुती''तच खरा संघर्ष!

CD

रायगडमध्ये ‘महायुती’तच खरा संघर्ष!
महाड, ता. ८ (बातमीदार) ः जिल्ह्यात दहा नगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी रायगड जिल्ह्यात मात्र आपले अस्तित्व टिकवण्यासाठी महायुतीमध्येच या निवडणुकीत खरा संघर्ष होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राजकीय नेत्यांमधील वादामुळे या निवडणुका चुरशीच्या ठरण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीमधील शिवसेना, भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) हे तीन प्रमुख पक्ष निवडणूक लढवणार आहेत. जिल्ह्यात भाजपचे तीन, शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आमदार आहे. या पक्षीय बळावर नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येथील जागावाटप व्हावे, अशी शिवसेनेची भूमिका आहे; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या भूमिकेशी सहमत नसल्याने सर्वच प्रमुख पक्ष आपापली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

लढतीचे स्वरूप
जिल्ह्यातील बहुसंख्य नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. पेण, पनवेल व उरण मतदारसंघांतील नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष ताकदीने उतरणार आहे. तर महाड, रोहा, श्रीवर्धन, कर्जत व अलिबागमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. यामुळे नगरपालिकांमधील मुख्य लढत ही महायुतीतील घटक पक्षांमध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इतर पक्षांची भूमिका
महायुती व आघाडीबाबत सद्यस्थितीत कोणतेही स्पष्ट निर्णय झाले नसले तरी, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि मनसे या पक्षांची भूमिकादेखील या निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे.

राजकीय वैमनस्य शिगेला
रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे आमदार व मंत्री भरत गोगावले, महेंद्र थोरवे व महेंद्र दळवी यांच्यात उघडपणे राजकीय वैमनस्य आहे. पालकमंत्रिपदाच्या वादातून आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपदापासून दूर व्हावे लागल्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष नगरपालिका निवडणुकांमध्ये उघड होणार आहे. तटकरे व गोगावले यांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावल्याने जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. जागा वाटपामध्ये तोडगा निघण्याची शक्यता कमी असल्याने महायुतीमधील अनेक पक्ष स्वतंत्रपणे आपली ताकद अजमावतील, असे प्राथमिक स्तरावर स्पष्ट चिन्ह दिसू लागले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुकूल असे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे हे रायगड जिल्ह्यातील असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरपालिका निवडणुकांमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक कामगिरी करेल. नगरपालिका निवडणुकांमध्ये युती-आघाडी विषयीचा निर्णय खा. सुनील तटकरे घेणार असून, त्यांच्या निर्णयाला आम्ही सर्व बांधील राहून काम करू.
- धनंजय देशमुख, प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाड विधानसभा मतदारसंघ

...........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT