मुंबई

बीकेसीतील ‘वर्क इंडिया मॅनेजमेंट’वर कारवाई

CD

मुंबई, ता. ३ : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मे. वी. वर्क इंडिया मॅनेजमेंट आस्थापनावर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. वारंवार सूचना देऊनही परवान्याशिवाय अन्न व्यवसाय करत असल्याने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी बीकेसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीकेसीतील मे. वी वर्क इंडियाच्या सी-२०, जी ब्लॉक या १६ मजली इमारतीमधील कार्यालयांवर ७ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी अन्न पदार्थांचा व्यवसाय करण्यासाठी परवाना अथवा नोंदणी घेतली नसल्याचे आढळून आले होते. त्यानंतर १७ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी रोजीही आस्थापनात पडताळणी केली असता विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे परिमंडळ ५ चे सहायक आयुक्त (अन्न) एस. एस. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी व. रु. आडे यांनी ही कारवाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT