मुंबई

दहावीच्या व्हायरल वेळापत्रकाचा विद्यार्थ्यांना फटका

CD

मुंबई, ता. ९ : राज्य शिक्षण मंडळाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या दहावीच्या वेळापत्रकाऐवजी समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवल्याने राज्यातील हजारो विद्यार्थी हिंदीच्या परीक्षेला मुकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परीक्षा न देऊ शकलेल्या असंख्या विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाकडे तक्रारीचा पाढा वाचला, तर अनेकांनी वर्ष वाया गेल्याने टाहो फोडत दु:ख व्यक्त केले आहे.
दहावीच्या हिंदी विषयाचा पेपर बुधवारी (ता. ८) होता; समाज माध्यमावर ‘नवनीत’सह अन्य शैक्षणिक संस्थांच्या नावाने व्हायरल झालेल्या वेळापत्रकात हा पेपर गुरुवारी (ता. ९) असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे असंख्य विद्यार्थी परीक्षेला मुकले. मुंबई विभागात हिंदीच्या पेपरसाठी दोन लाख ५९ हजार १५३ जणांची नोंदणी होती, त्यापैकी २ लाख ५२ हजार ९८० विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला. त्यामुळे तब्बल सहा हजार १७३ मुले गैरहजर राहिली. यापैकी बहुतांश जणांना समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकाचा फटका बसला.
दरम्यान, काही विद्यार्थ्यांना व्हायरल वेळापत्रकात हिंदी पेपरची माहिती चुकीची असल्याचे वेळेवर लक्षात आले. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र गाठले; मात्र तोपर्यंत बराच वेळ निघून गेल्याने त्यांना परीक्षेला बसता आले नाही. काही विद्यार्थ्यांना हिंदीचा पेपर कालच झाल्याचे कळाल्याने धक्काच बसला. आपले वर्ष वाया जाणार या भीतीने अनेकांनी
मंडळाच्या संकेतस्थळावर तसेच विभागीय कार्यालयात जाऊन चौकशी केली. तसेच शिक्षण मंडळाने नियुक्त केलेल्या समुपदेशकांना अनेकांनी फोन करत आमचा पेपर आता कधी होईल, याबाबत विचारणा केली.
--
‘नवनीत’कडून खुलासा
समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकांमध्ये ‘नवनीत’च्या नावाने प्रसिद्ध झालेल्या वेळापत्रकाचाही समावेश होता. त्याबाबत त्यांनी खुलासा जाहीर केला. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आम्ही वेळापत्रक छापले होते. सदर वेळापत्रकाखाली शाळेकडून देण्यात येणारे छापील वेळापत्रक हेच अंतिम असेल. त्यावरून खात्री करून घ्यावी व परीक्षेला प्रविष्ट व्हावे, अशी स्पष्ट सूचना दिली होती, असे नवनीत एज्युकेशन लिमिडेटने आपल्या खुलाशात स्पष्ट केले आहे.
--
पुरवणी परीक्षेचाच पर्याय
हिंदीचा पेपर बुडालेल्या विद्यार्थ्यांना हा पेपर जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेत द्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना समुपदेशकांकडून मार्गदर्शन केले जात आहे; मात्र सध्या त्यांच्या गुणपत्रिकेत या पहिल्या परीक्षेत हिंदीच्या पेपरची अनुपस्थिती लागणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना चिंता लागली आहे.
--
कोट
राज्य शिक्षण मंडळाने वेळोवेळी मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकांवर अवलंबून राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‍त्याच वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी परीक्षांना सामोरे जावे असेही सूचवले जाते. समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवणे ही त्यांची चूक आहे. वर्ष वाचवण्यासाठी पुरवणी परीक्षेत पेपर देण्याचा एकमेव पर्याय आहे.
- डॉ. सुभाष बोरसे, अध्यक्ष, मुंबई विभागीय मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT