मुंबई

देशात प्रथमच ‘द साउंड ऑफ म्युझिक’

CD

मुंबई, ता. ३ : नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या वतीने मुंबईत ‘द साऊंड ऑफ म्युझिक’ सादर करण्यात येत असून, हे आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय ब्रॉडवे म्युझिकलपैकी एक आहे.

सात वेळा टोनी पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या कार्यक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय ब्रॉडवेचे भारतात पदार्पण आहे. १९३० दरम्यान ऑस्ट्रियामध्ये संगीत, प्रणय आणि संघर्षावर आनंदाद्वारे मानवी विजयाचे चित्रण हा कार्यक्रम करतो. या दर्जेदार कलाकृतीत ‘माय फेव्हरेट थिंग्ज’, ‘डू रे मी’, ‘द हिल्स आर अलाइव्ह’ आणि ‘सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हेंटीन’ यांसारख्या २६ गाजलेल्या गाण्यांचा समावेश आहे.

आम्ही ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल’मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट संगीताचे प्रदर्शन केले आणि आता अजूनपर्यंतचे सर्वात लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संगीत भारतात आणत आहोत. ऑस्ट्रियातील १९३०च्या दशकातील निसर्गरम्य पार्श्वभूमी, लाइव्ह ऑर्केस्ट्रा आणि रंगमंचावर लाइव्ह गायनाचा अनुभव इथे मिळेल. ‘द साऊंड ऑफ म्युझिक’ हे प्रेम, हास्य आणि संगीताचा एक अविस्मरणीय कार्यक्रम आहे. या उन्हाळी सुटीत तुम्हाला आंतरराष्ट्रीय कलाकृतीच्या अनुभवासाठी भारताबाहेर जाण्याची गरज नाही, असे संस्थापक अध्यक्ष नीता मुकेश अंबानी म्हणाल्या. या कार्यक्रमाचे तिकीट www.nmacc.com किंवा www.bookmyshow.com या संकेतस्थळावरून बुक करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT