मुंबई

कुलपती घेणार विद्यापीठांचा आढावा

CD

मुंबई, ता. १३ ः राज्यातील अकृषी आणि मुक्त विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची बैठक राज भवन येथे सोमवारी (ता. १५) बोलावण्यात आली आहे. राज्यात लागू केल्या जाणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर आढावा या बैठकीत घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कुलगुरूंची आढावा बैठक तत्कालीन राज्यपालांनी घेतली होती. त्यानंतर आता ही बैठक होत आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम, शिकवण्याच्या पद्धती आणि कौशल्य विषय अभ्यासक्रम वाढणार आहे. त्यामुळे त्यात शैक्षणिक दिनदर्शिका कशा प्रकारची तयार केली जाईल, याची माहिती आणि तयारी संबंधित विद्यापीठांनी कशाप्रकारे केली, हा विषयही बैठकीच्या अजेंड्यावर असण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन, विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निवडणुका आणि त्याच्या संदर्भातील कार्यवाही, विद्यापीठातील विविध प्रकारचे उपक्रम, शैक्षणिक दिनदर्शिकेचे पालन, नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विषयक नवीन पदवी, पदविका आदी अभ्यासक्रम आणि त्यांची रचना, यंदा नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या सेल्फ फायनान्स कोर्सेसची रचना, त्यासाठी करण्यात येणारे उद्योग संस्थांसोबतचे करार, इनोव्हेशन आणि स्टार्टअप्स आदींसाठी विद्यापीठांनी मागील काही महिन्यांत केलेल्या कामकाजाचा आढावा आदी विषयही या आढावा बैठकीत घेतले जाण्याची शक्यता आहे.
--
डीनच्या जागा‍ अजून रिक्त
राज्यातील १४ विद्यापीठांमध्ये अजूनही विविध विषयांतील डीनच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यात सर्वाधिक अशा रिक्त अशा ६ जागा मुंबई विद्यापीठात, त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडमध्ये ४ हून अधिक जागा रिक्त आहेत. तसेच अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, एसएनडीटीमध्ये प्रत्येकी २ हून अधिक जागा रिक्त आहेत. अनेक ठिकाणी प्रभारी पदावर कार्यभार सुरू आहे. तर लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील पदे अजूनही मंजुरीविना पडून आहेत.
--
चार विद्यापीठांच्या कुलगुरूंचा निर्णय रखडला
मुंबई, पुणे, रामटेक आणि नाशिक येथील मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा विषय अद्यापही पूर्ण झाला नाही. मुंबई, पुणे, नाशिक या विद्यापीठांच्या कुलगुरूपदांसाठी मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे; तर मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अंतिम मुलाखतीही झाल्या आहेत. मात्र त्यासाठी अंतिम निवड होऊ शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT