Amazon  sakal
मुंबई

Mumbai : ॲमेझॉन वेब सर्व्हिसची भारतात १२.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक; १,३१,७०० नोकऱ्या निर्माण होण्यास मदत

भारतातील डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरमधील या नियोजित गुंतवणुकीमुळे दरवर्षी भारतीय व्यवसायांमध्ये सरासरी १,३१,७०० पूर्णवेळ नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होईल.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ॲमेझॉन वेब सर्व्हिसतर्फे सन २०३० पर्यंत भारतात क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये १२.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाईल. त्यामुळे भारताच्या जीडीपीमध्ये दोन लाख कोटी रुपयांची भर पडेल असा अंदाज आहे. भारतातील ग्राहकांची क्लाऊड सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ही गुंतवणूक केली जाईल.

भारतातील डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरमधील या नियोजित गुंतवणुकीमुळे दरवर्षी भारतीय व्यवसायांमध्ये सरासरी १,३१,७०० पूर्णवेळ नोकऱ्या निर्माण होण्यास मदत होईल. या नोकऱ्या भारतातील डेटा सेंटर पुरवठा साखळीतील उभारणी, सुविधा, देखभाल, अभियांत्रिकी, दूरसंचार आणि इतर क्षेत्रातील असतील.

यापूर्वी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने भारतात ३०,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून सन २०३० पर्यंत त्यांची भारतातील गुंतवणूक १,३६,५०० कोटी रुपयांवर (१६.४ अब्ज डॉलर) पोहचेल. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या भारतातील १२.७ अब्ज डॉलर गुंतवणुकीमुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले.

ॲमेझॉन वेब सर्व्हिसच्या भारत व दक्षिण आशिया विभागाचे पुनीत चंधोक म्हणाले, की २०१६ पासून, ॲमेझॉन वेब सर्व्हिसने भारतात क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याव्यतिरिक्त आणि स्थानिक ग्राहक आणि भागीदारांना डिजिटल परिवर्तनाला मदत करण्याव्यतिरिक्त, २०१७ पासून भारतातील चाळीस लाखांहून अधिक लोकांना क्लाऊड प्रशिक्षण दिले आहे. २०३० पर्यंत १२.७ अब्ज डॉलरची आमची नियोजित गुंतवणूक भारताला जागतिक डिजिटल पॉवर हाऊस बनण्यास मदत करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT