मुंबई

व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांकावर करा कचऱ्या संबंधी तक्रार

CD

‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’वर करा कचऱ्याबाबत तक्रार
सोमवारपासून घनकचरा व्यवस्थापन विभागाची मोहीम

कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता यावी आणि त्यांचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी महापालिका सरसावली असून एक व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक (८१६९६८१६९७) उपलब्ध करून देण्यात आला आहे. घनकचराविषयक तक्रारींच्या निर्मूलनाकरिता एक थेट व्यासपीठ त्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार (ता. ५) पासून सेवा कार्यान्वित होणार आहे.

महापालिकेतर्फे मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पाणी, आरोग्य आणि शिक्षणासारख्या नागरी सेवा-सुविधांसोबत सार्वजनिक रस्त्यांची स्वच्छताही राखली जात आहे; परंतु अनेकदा नागरिकांची बेफिकिरी आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून, मुंबईत घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना थेट संपर्क सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार घनकचरा व्यवस्थापन खात्याने व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. पर्यावरण दिनानिमित्त सोमवार (ता. ५) पासून ती कार्यान्वित होणार आहे.
नागरिकांना घनकचराविषयक तक्रारी करण्यासाठी ८१६९६८१६९७ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर नागरिकांना ‘कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे व मृत जनावरे उचलणे’ याबाबतच्या तक्रारीसंबंधीचे थेट छायाचित्र पाठवता येणार आहे. नागरिकांनी छायाचित्रासह संबंधित ठिकाणाचा पत्ता आणि जीपीएस लोकेशन शेअर करणे आवश्यक आहे.

अशी होईल कार्यवाही
- नागरिकांची तक्रार व्हॉट्सॲप चॅटबॉटवर नोंदणीकृत झाल्यानंतर, ती संबंधित विभागाकडे थेट जाईल. थेट संपर्कामुळे त्वरित कार्यवाही करणे शक्य होणार असून सध्या तक्रार निर्मूलनाकरिता लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे.
- संबंधित घनकचरा व्यवस्थापन अधिकारी तक्रारींचे निश्चित वेळेत निर्मूलन करून, त्या ठिकाणची छायाचित्रे अपलोड करतील. परिणामी तक्रारीवर कार्यवाही झाल्याचे नागरिकांच्याही निदर्शनास येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT