मुंबई

आज अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी

CD

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज
मुंबई, ता. ९ : मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी (ता. १०) जाहीर केली जाणार आहे.
दुसऱ्या यादीत कॉलेज मिळाल्यास प्रवेश घेण्यासाठी १० ते १२ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थ्यांनी लॉगिनमध्ये ‘प्रोसिड टू ॲडमिशन’वर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत व कॉलेजमध्ये जात प्रवेश घ्यावा. तसेच प्रवेश घ्यायचे नसेल, तर विद्यार्थी पुढील प्रवेश फेरीसाठी वाट पाहू शकतात; मात्र दुसऱ्या यादीनंतर नियमित प्रवेशाची केवळ एकच फेरी होणार आहे. पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. हा प्रवेश नाकारल्यास किंवा न घेतल्यास विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवेशाची संधी मिळणार नाही. प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

..
आतापर्यंत झालेले प्रवेश
कोटा उपलब्ध जागा एकूण प्रवेश

ऑनलाईन २,२९,००३ ५७,४५०
इनहाऊस २६,२२५ ५४४२
अल्पसंख्याक १,०७,०१५ १३,०३४
व्यवस्थापन १८,५९३ ६५१
एकूण ३,८०,८३६ ७६,५७७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभे राहिले अन्‌ तिघांच्या आयुष्य क्षणात संपले... एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Astronomical Events 2026: नववर्षात ४ सुपरमून, २ ब्लूमून व १२ उल्कावर्षाव; देशवासीयांना विविध खगोलीय घटनांची मिळणार पर्वणी

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT