मुंबई

शाळाबाह्य मुलांचे आव्हान

CD

शाळाबाह्य मुलांचे आव्हान
मुंबई विभागात ४,१७८ जण; आजपासून राज्यव्यापी सर्वेक्षण
मुंबई, ता. ३० : मुंबई आणि परिसरात एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत विविध कारणांमुळे शाळा आणि एकूणच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांचे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. यात मुंबईतील दोन हजार ३५१ शाळा परिसर आणि एक हजार ४४ वस्त्यांमध्ये तब्बल चार हजार १७८ मुले विविध कारणांमुळे शाळा आणि शिक्षणापासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे.
या सर्व मुलांची ओळख झाली असल्याने त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विभागाकडून विविध उपक्रम आणि मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, असंख्य मुले अजूनही शाळांमध्ये येत नसल्याने यासाठीचे एक मोठे आव्हान विभागापुढे निर्माण झाल्याचे दिसून येते.
शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार प्रत्येक वर्षी शाळाबाह्य अथवा शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे बंधनकार आहे. याच पार्श्वभूमीवर विभागाच्या शिक्षण आणि समग्र शिक्षा विभागाकडून मुंबई ‍परिसरातील विविध शाळा, वस्त्या अशा ठिकाणी तसेच शाळांच्या परिसरात हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये चार हजार १७८ मुले‍ ‍विविध कारणांमुळे शाळांत येत नाहीत. ती शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून आले. यापैकी दोन हजार २८९ एवढ्या निम्‍म्‍या मुलांचे शाळेत नाव घातले, परंतु या मुलांनी शाळेकडे फिरकूनही पाहिलेले नाही.
गरिबी, सामाजिक, आर्थिक परिस्‍थितीमुळे ते शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिले असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीची प्रक्रिया महापालिका शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. यात प्रत्येक मुलाला जवळच्या शाळांमध्ये शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
-
शाळेत कधीही न येणारी मुले
मुंबईतील राज्य शिक्षण मंडळासोबत महापालिका इत्यादी शाळांच्या दोन हजार ३५१ शाळा परिसरात एक हजार ४४ वस्त्यांमध्ये ही बालके सापडली. त्यात शाळा सोडणारी, शाळाबाह्य झालेली आणि नियमितपणे शाळेत न येणाऱ्या मुलांची संख्या ३८७ इतकी असून, ती १८६ शाळा परिसरातील आणि २९ वस्त्यांतील आहेत. शाळा सोडणारी, शाळाबाह्य झालेली आणि नियमितपणे शाळेत न येणाऱ्या मुलांची संख्या ५५८ इतकी आहे. ही मुले १२२ शाळा परिसरात आणि २७ वस्त्यांमध्ये आढळली आहेत.

शाळेत नोंदणी, मात्र शाळा सोडली
मुंबईतील विविध शाळांमध्ये प्रवेश घेऊन नोंदणी झालेली परंतु त्यानंतर शाळा सोडणारी आणि त्यातून शाळाबाह्य झालेली ३०० मुले असून, ती १९१ शाळा परिसरांत आणि १४५ वस्त्यांमध्ये आढळली आहेत. ही मुले शाळांमध्ये नोंदणी असतानाही नियमितपणे शाळेत न येणारी आहेत.

राज्यभरातील माहिती घेणार
राज्यातील सामाजिक कारणास्तव तसेच स्थलांतरामुळे शाळाबाह्य ठरलेल्या मुलांचे सर्वेक्षण मंगळवार, १ जुलैपासून केले जाणार आहे. यासाठी राज्यभरात मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. या सर्वेक्षणासाठी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरे, गावपातळीवर स्थलांतरित झालेल्या शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना शिक्षण संचालकाने जारी केल्या आहेत.

शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी स्थानिक प्रशासन, शिक्षण विभाग, मुख्याध्यापक व शिक्षक सातत्याने प्रयत्न करीत असतात. पालिका आणि खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षक हे अंदाजे डिसेंबरपासूनच पुढील वर्षासाठी मुलांना प्रवेश घेण्यासाठी सर्व्हे करतात. आपापल्या विभागांमध्ये फिरत असतात, ही कौतुकाची बाब म्हणता येईल.
- विजय पाटील,
कार्याध्यक्ष, महापालिका माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेना मुंबई
उपाययोजनांची गरज

रस्त्यावर फिरणारी मुले, बस स्टॉप, रेल्वेस्‍थानकांच्या पुलाखाली वास्तव्य करणारी अनाथ एकटी मुले शाळेमध्ये येऊ शकतील; परंतु त्यांच्याकडे कोणत्‍याही प्रकारची कागदपत्रे उपलब्ध नसतात. त्यांना जन्मदाखला, कुटुंबीयांच्या माहितीची कागदपत्रे, आधार कार्ड उपलब्ध करून देणे
- पालक असूनही मुले शाळेत जात नाहीत, अशी मुले शोधून त्यांना शाळेत आणणे
- कोणीही पालक नाहीत अनाथ आहेत, त्यांना शिक्षणासाठी खास सोय करणे
- आधार कार्ड नसल्‍याने स्टुडन्ट पोर्टलला प्रवेश नोंदणी होत नाही, यावर पर्याय काढणे
- गरज पडल्यास मुलांना आहे त्या परिसरात सिग्नल शाळांप्रमाणे सेवाभावी संस्थांच्या मदतीने शिक्षण उपलब्ध करून देणे
- मुलांना शाळेत येण्यासाठी नेमक्या अडचणींचा शोध घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Dahi Handi 2025 : जिथं जय जवान पथक कोसळलं, तिथंच कोकण नगर पथकानं रचला 10 थरांचा इतिहास; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनीही केलं कौतुक

Home Loan: घर खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का! देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने होम लोन केले महाग

Irfan Pathan : धोनीने मला संघाबाहेर ठेवलं...! इरफान पठाणने सांगितला २००९ चा 'तो' प्रसंग, नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates : जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने रचला २०२५ मधील पहिला १० थरांचा विश्वविक्रम

'आयुष्यात सगळंच अवघड होऊन बसलय' गोविंदाची पत्नी मंदिरात मोठमोठ्याने रडली, पण नक्की झालं काय?

SCROLL FOR NEXT