मुंबई

दादरमध्ये ६ जुलैला ‘अभंगवारी’ रंगणार

CD

दादरमध्ये ६ जुलैला ‘अभंगवारी’ रंगणार
आषाढी एकादशीनिमित्त विठूनामाचा जयघोष

मुंबई, ता. २९ : आषाढी एकादशीची वारी उत्साहात सुरू असताना मुंबईत ‘अभंगवारी’ रंगणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त अभंग रिपोस्टचा खास कार्यक्रम ‘सकाळ मीडिया’ प्रस्तुत करीत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक हॉटेल टीपटॉप प्लाझा आहे. ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रवींद्र नाट्यमंदिर येथे अभंगवारीचा हा सोहळा रंगणार आहे.
अभंग रिपोस्ट या बॅण्डने संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव यांचे अमृतमय अभंग रॉक, रेगे, पॉप आणि लोकसंगीताच्या तालात सजवले आहेत, तरी मूळ अभंगांचा भक्तिदायक आधार टिकून आहे. अभंग रिपोस्ट या बँडने अनेक पुरस्कार तर जिंकलेच आहे. गणपती मंडळांपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर जर्मनी व मॉरिशस येथेदेखील अभंगांची आधुनिक शैली लोकांपर्यंत पोहोचवली आहे. मुंबईकरांसाठी ‘सकाळ’चा ‘वारीचा आत्मिक अनुभव’ शहरातच उपलब्ध करून देणाऱ्या अभंगवारी या सोहळ्याची BookMyShow वर तिकिटे केवळ ३०० रुपयांपासून आहेत. त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. मर्यादित तिकिटांच्या पार्श्वभूमीवर चाहत्यांना तिकीट लगेच बुक करा, असे आवाहन करण्यात आले आहे. या भक्तिमय यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी तुमची जागा निश्चित करा आणि शहरातच पंढरपूरची अनुभूती घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT