मुंबई

गोंदणकलेच्या संशोधनासाठी अभ्यासगट स्थापन करा

CD

गोंदणकलेच्या संशोधनासाठी अभ्यास गट स्थापन करा
मंत्री आशीष शेलार यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : पारंपरिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याकरिता पावले उचलावीत तसेच गोंदणकलेसंदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यास गट तातडीने स्थापन करावा, असे निर्देश आज सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी आज येथे दिले.
मंत्रालयात राज्यातील गोंदण कलाकारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत शेलार यांनी हे निर्देश दिले. या वेळी वरिष्ठ अधिकारी तसेच गोंदण कलाकारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रात विविध भागांत पारंपरिक गोंदणकला खूप प्राचीन काळापासून प्रचलित असून, लोकसंस्कृतीचा भाग आहे. विवाह प्रसंगासह विविध उत्सवांमध्ये विविध धार्मिक चिन्हे शरीरावर गोंदून घेण्याची परंपरा राज्यात अनेक समाजांमध्ये आहे. दरम्यान, आधुनिक तंत्रज्ञानामुळे या कलेवर परिणाम होत आहे. राज्याच्या सर्व भागांत समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या पारंपरिक गोंदणकलेसंदर्भात सर्वंकष संशोधन होणे आवश्यक आहे, अशी भावना मंत्री शेलार यांनी या वेळी व्यक्त केली. नवयुवकांमध्ये टॅटू आर्टच्या माध्यमातून गोंदणकला लोकप्रिय असून, गोंदणकलेमुळे हजारो नवयुवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे या कलेकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
...
गोंदणकलेविषयी संशोधन करून उच्च शिक्षण अभ्यासक्रमात गोंदणकलेचा समावेश केल्यास हजारो नवयुवकांना एक पारंपरिक कला आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून उपजीविकेसाठी उपलब्ध होईल.
- आशीष शेलार, सांस्कृतिक कार्य मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT