सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगरातील १, २ व ३ म्हाडा वसाहतीचा पुनर्विकास केला जाणार आहे. यासाठीचा करार म्हाडाने अदाणीसोबत केला आहे, पण स्थानिकांना विचारात घेतले नसल्याचा आरोप रहिवाशांनी केल्याने हा प्रकल्प वादात सापडला आहे.
मोतीलाल नगरमधील प्रत्येक रहिवाशाला २,४०० चौरस फूट क्षेत्रफळाचे घर, तर व्यावसायिक गाळेधारकला २,०७० चौरस फुटांचा गाळा मिळावा, अशी रहिवाशांची मागणी आहे. त्याबाबत डोळेझाक करत म्हाडाने पुनर्विकासाअंतर्गत प्रत्येक रहिवाशाला १,६०० चौरस फूट बिल्टअप क्षेत्रफळाचे घर आणि ९७१ चौरस फूट बिल्टअप क्षेत्रफळाचा गाळा देऊ केला आहे. तसेच बांधकाम आणि पुनर्वसन एजन्सी म्हणून अदाणीची नियुक्ती केल्याने रहिवासी नाराज आहेत.
-------------------------------------------------
आझाद मैदानात बुधवारी धरणे
सरकार आणि म्हाडाच्या मनमानीचा जाब विचारण्यासाठी रहिवासी आक्रमक झाले आहेत. तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी (ता. १६) आझाद मैदानात रहिवासी धरणे आंदोलन करत नाही, पण हा निर्णय घेताना राज्य सरकार आणि म्हाडा मनमानी करत असल्याचा आरोप होत आहे.
---------------------------------------
प्रमुख मागण्या
- प्रति रहिवासी ३० लाख रुपये कॉर्पस फंड.
- रहिवाशांपुढे मास्टर प्लॅनचे सादरीकरण करा.
- म्हाडा-अदाणीमध्ये झालेला करार, एलओए तत्काळ स्थगित करा.
- मोतीलाल नगर विकास समितीद्वारे नियुक्त वास्तुविशारद यांनी बनविलेल्या प्रकल्प अहवालानुसार प्रत्येक निवासी गाळेधाराकाला पुनर्विकासित इमारतीमध्ये किमान २४०० चौ.फू. कार्पेट क्षेत्रफळाचे मोफत घर द्या.
- मोतीलाल नगरला विशेष प्रकल्पाचा दर्जा असला तरी, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुनर्विकास प्रक्रियेत ३३(५) च्या नियमांचे पालन करा. ७९ ‘ए’ या सरकारच्या निर्देशाचे काटेकोर पालन करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.