मुंबई

निवृत्त पोलिसांना सन्मानाने अखेरचा निरोप

CD

निवृत्त पोलिसांना सन्मानाने अखेरचा निरोप
कुटुंबाला सर्वताेपरी सहकार्य करणार; महासंचालक रश्मी शुक्ला
मुंबई, ता. २५ : पोलिस दलात ३० ते ४० वर्षे सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेल्या पोलिस अधिकारी आणि आमदारांना मृत्यूनंतर सन्मानाने अखेरचा निरोप देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या महासंचालक कार्यालयाने घेतला आहे. महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबत सोमवारी (ता. २१) स्थायी आदेश जारी केले.
सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त घेतलेले, वैद्यकीय कारणास्तव निवृत्ती घेणाऱ्या पोलिस महासंचालकांपासून आमदारांपैकी कोणाचाही मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना भावनिक आधार देणे, ही पोलिसदलाची जबाबदारी आहे, असे शुक्ला यांनी नमूद केले आहे. त्यांच्या आदेशानुसार निवृत्त अधिकारी, अंमलदाराच्या निधनाचे वृत्त समजताच संबंधित पोलिस कार्यालय त्या वृत्ताची खात्री करेल. पदानुसार पोलिस अधिकारी संबंधिताच्या निवासस्थानी गणवेशात उपस्थित राहून कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी मदत करतील. हार-फुलांसाठी आर्थिक मदत करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार वाहन तसेच एस्कॉर्टची सुविधा उपलब्ध करून देण्याबराेबर दलाच्या वतीने लेखी शोकसंदेश, मृताच्या कुटुंबीयांना पेन्शन, विमा आदी लाभ मिळवून देण्यात सहकार्य केले जाईल. महासंचालक दर्जाच्या निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल, तर मृत पोलिसाचा फोटो, त्यांची सेवा, निधनाचे वृत्त दक्षता मासिकातून प्रसिद्ध केले जाईल. तसेच, निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी माहिती संकलित करण्याची सूचना या आदेशाद्वारे शुक्ला यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

MPSC Update : एमपीएससीची ‘ई-केवायसी’ प्रक्रिया सुरू; उमेदवारांना ओळख पडताळणी बंधनकारक, विद्यार्थ्यांकडून स्वागत

Health Tests For Men: पन्नाशीनंतर निरोगी राहण्यासाठी पुरुषांनी कराव्यात 'या' ५ महत्त्वाच्या चाचण्या

Temple Land : ‘देवस्थानच्या जमिनींचे संरक्षण विश्वस्तांनी करावे’ : शेखर गायकवाड

SCROLL FOR NEXT