मुंबई

‘प्रोजेक्ट उत्थान’च्या परवाना प्रमाणपत्राचे हस्तांतरण

CD

‘प्रोजेक्ट उत्थान’च्या परवाना प्रमाणपत्राचे हस्तांतरण
दीड लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शाळांमधील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र बळकट करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशन यांच्यात ‘प्रोजेक्ट उत्थान’ हा प्रकल्प राबविला जात आहे.
पालिका आणि अदाणी समूह यांच्यात या प्रकल्पासंदर्भातील परवाना प्रमाणपत्र आज मुंबई महापालिका मुख्यालयात हस्तांतरित करण्यात आले. पालिकेच्या शाळांमधील दीड लाख विद्यार्थ्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर, अदाणी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शर्मा, शनय शहा, कैलास शिंदे, जतीन उपाध्ये, सुबोध सिंग आदी या वेळी उपस्थित होते.
पालिका, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि अदाणी फाउंडेशन यांच्यात शिक्षणकेंद्रित सार्वजनिक-खासगी भागीदारीअंतर्गत २०२१ पासून ‘प्रोजेक्ट उत्थान’ हा प्रकल्प राबविला जात आहे. केंद्र शासनाच्या ‘निपुण भारत मिशन’शी सुसंगत असलेला हा प्रकल्प राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवण्यात येत आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागाने जानेवारी-एप्रिल २०२५मध्ये इयत्ता दुसरीच्या सर्व ३१ हजार विद्यार्थ्यांना घेऊन प्रायोगिक तत्त्वावर एक प्रकल्प राबविण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणात लक्षणीय प्रगती दिसून आली आहे.
या प्रकल्पाचा २०२५-२८ या तीन शैक्षणिक सत्रांसाठी आणि इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आता विस्तार करण्यात आला आहे. पालिकेच्या ९४७ शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथीच्या सुमारे दीड लाखांहून विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. देशात इतक्या व्यापक प्रमाणावर कार्यरत असलेल्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Dasara Melava: भगवानगडावरील पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर, बीडचं राजकारण तापणार!

Kolhapur Shahi Dussehra : शाही दसरा सोहळा, अडीचशे वर्षांची परंपरा; हत्तींची जागा घेतली मेबॅक मोटारीने, छत्रपतींची अगवाणी पोलिस दलाकडून

Dussehra Melava 2025 Live Update : मराठवाड्यात पूर, शेतकरी अडचणीत, मात्र, मुख्यमंत्री शेतकऱ्यांबरोबर - पंकजा मुंडे

Dussehra Tradition: रावण-मेघनाथाला पळवून पळवून ठार केले; १७३ वर्षांची परंपरा असलेला UP तील अनोखा दसरा

पैसा बोलता है! देशात महाराष्ट्र अन् शहरांमध्ये पुणे, भ्रष्टाचारात आघाडीवर; NCRBच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT