मुंबई

विनातिकीट प्रवाशांवर पश्चिम रेल्वेचा लगाम; चार महिन्यांत ७१ कोटींची दंडवसुली

CD

विनातिकीट प्रवाशांवर पश्चिम रेल्वेचा लगाम
चार महिन्यांत ७१ कोटींची वसुली; एसी लोकलमधून ९३ लाखांपेक्षा अधिक दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : पश्चिम रेल्वेने एप्रिल ते जुलै २०२५ या चार महिन्यांत विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरोधात तिकीट तपासणी मोहीम राबवून तब्बल ७०.९८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही रक्कम गेल्यावर्षी याच कालावधीच्या तुलनेत २४ टक्क्यांनी अधिक, तर रेल्वे बोर्डाच्या उद्दिष्टाच्या ११ टक्के अधिक आहे.
या मोहिमांचा उद्देश प्रवाशांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार सेवा पुरवण्यासोबतच विनातिकीट प्रवासाला आळा घालणे हाच आहे. वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही मोहीम मुंबई उपनगरीय लोकल, एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि हॉलिडे स्पेशल गाड्यांमध्ये सातत्याने राबवली जात आहे.

मुंबईतूनच १९.५५ कोटींची वसुली
या एकूण दंडात मुंबई उपनगरीय रेल्वे खंडातून वसूल करण्यात आलेली १९.५५ कोटी रुपयांची रक्कमदेखील समाविष्ट आहे. फक्त जुलै महिन्यातच सुमारे २.२२ लाख प्रकरणांवर कारवाई करीत १२.१९ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यापैकी उपनगरीय विभागात ९२ हजार प्रवाशांकडून ३.६५ कोटी रुपये दंड आकारण्यात आला.

एसी लोकलमध्ये अधिक फुकटे

एसी उपनगरीय लोकलमध्ये अनधिकृत प्रवेश थांबवण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष लक्ष केंद्रित केले असून, एप्रिल ते जुलै या कालावधीत २८ हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई करीत ९३.४० लाख रुपयांचा दंड वसूल केला गेला. ही रक्कम मागील वर्षीच्या तुलनेत ५८ टक्क्यांनी अधिक आहे.

रेल्वेचे आवाहन
पश्चिम रेल्वेने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे, की त्यांनी नेहमी वैध तिकिट घेऊनच प्रवास करावा. अशा तपासणी मोहिमेमुळे विनातिकीट प्रवासावर आळा बसतो, प्रवाशांचा अनुभव सुधारतो आणि सार्वजनिक महसुलाचे रक्षण होते, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rules: RBIने सर्वसामान्यांना दिला मोठा दिलासा; 'या' तारखेपासून कर्ज घेणे होणार सोपे, EMI पण कमी होणार

Kolhapur Politics : सतेज पाटील यांनी असदुद्दीन ओवेसींना थेट सुनावलं, कोल्हापुरात ध्रुवीकरणाचा अजेंडा चालणार नाही; ओवेसींचेही उत्तर...

'जिने घडवलं तिलाच अनफॉलो केलं' दीपिका आणि फराहमध्ये बिनसलं? रणवीरलाही अनफॉलो केलं

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंनी दिली नवरात्रोत्सव मंडळाला भेट

Hingoli Crop Loss : 'कोणी ऐकत नसेल, तर कानाखाली वाजवू'; संतापलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा कोणाला इशारा?

SCROLL FOR NEXT