मुंबई

वेळ पडल्यास हाती शस्त्र घेऊ!

CD

वेळ पडल्यास हाती शस्त्र घेऊ!
जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांचे वादग्रस्त विधान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : दादर येथील कबुतरखाना वाचवण्यासाठी आवश्यकता पडल्यास हाती शस्त्र उचलू, असे वादग्रस्त विधान जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी केले. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे; मात्र आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कबुतरखाने वाचवण्यासाठी जैन समाजाकडून न्यायालयीन लढाईसह शांती यात्रा काढण्यात आली; मात्र त्यातून फारसे काही साध्य होत नसल्याने जैन समाजाने बुधवार (ता. १३)पासून उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत माहिती देताना जैन मुनी नीलेशचंद्र यांनी न्यायालय धर्माच्या विरुद्ध गेल्यास आम्ही त्याचा आदर करणार नाही. तसेच आवश्यकता पडली तर आम्ही शांततामय समाज असूनही हातात शस्त्र उचलण्यात येईल. पालिकेने, न्यायालयाने आणि प्रशासनाने आम्हाला विरोध केल्यास पुन्हा इथेच आंदोलन करण्यात येईल. देशभरातून लाखो जैनबांधव त्यात सहभागी होतील, असाही इशारा त्यांनी दिला; मात्र यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका सुरू झाल्यानंतर आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचे सांगितले. मला आवश्यकता पडली तर आम्ही आमरण उपोषणाचे शस्त्र उगारू, असे म्हणायचे होते; मात्र बोलताना घाईत अर्धच वाक्य बोलले गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
----
कायंदे यांची माफी
आंदोलनातील प्रमुख नेते, माजी नगरसेवक पुरण दोषी यांनी आमदार मनीषा कायंदे यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मी आमदार मनीषा कायंदे यांच्याविषयी बोलताना चुकून एकेरी उल्लेख केला. मला त्यांच्याबद्दल आदर असून घाईगडबडीत चूक झाली. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे दोषी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack Case: वैद्यकीय चमत्कार! हार्टअटॅकने हृदयाचा एक भाग फाटला, रक्ताच्या गाठी जमा झाल्या... तरीही सोलापूरच्या डॉक्टरांनी वाचवले प्राण

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे एका व्यासपीठावर, फडणवीसही राहणार उपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला, CSKने तुक्का मारला अन् स्टार सापडला; एबी डिव्हिलियर्सने IPL फ्रँचायझीचे टोचले कान

HSRP Number Plate: 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख! HSRP नंबर प्लेटसाठी आजच अर्ज करा

BJP आमदाराच्या मुलाने रस्त्यात गाडी लावल्यानं वाहतूक कोंडी, पोलिसांशी हुज्जत घालत म्हणाला, चल निघ

SCROLL FOR NEXT