टाटा पॉवरचे ‘घरघर सोलर’
सौरऊर्जा प्रणालीसाठी विशेष योजना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : हरितऊर्जा अशी ओळख असलेल्या सौरऊर्जा वापराला चालना मिळण्यासाठी टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल्सने घरघर सोलर ही विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यभरात ही मोहीम राबवली जाणार असून, त्याची सुरुवात पुण्यात करण्यात आली आहे. निवासी घरांवर सौरऊर्जा प्रणालींचा वापर वाढवणे आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वीज उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
नव्या योजनेत ग्राहकांना फक्त १,९४७ रुपये भरून छतावरील सौर प्रणाली घेता येईल. ही रक्कम भारताच्या स्वातंत्र्य वर्षाचे प्रतीक असून, ग्राहकांची वाढीव वीजबिलापासून सुटका होऊ शकते. त्यामुळे सामान्य वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे, तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना मिळू शकणार आहे. या मोहिमेत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी १८००२५७७७७७ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीने केले आहे. ‘टाटा पॉवर सोलारूफ’ने महाराष्ट्रात जुलै २०२५पर्यंत एकूण ७७५ मेगावॉट इतक्या क्षमतेच्या निवासी छतांवर सौरऊर्जा यंत्रणा बसविल्या असून, याचा लाभ २७,९१० ग्राहकांना मिळाला आहे. पुढील तीन वर्षांत आणखी ८०० मेगावॉट क्षमतेचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुण्यात आधीच २०० मेगावॉट क्षमतेसह भक्कम उपस्थिती असलेल्या कंपनीने त्याच कालावधीत आणखी २५० मेगावॉट क्षमता वाढवण्याची योजना आखली आहे.
- सौर प्रणालीच्या किमतीसाठी जवळपास १०० टक्के कर्जसुविधा
- दोन किलोवॉट क्षमतेच्या प्रणालीसाठी २,३६९ रुपयांपासून मासिक हप्ते,
- ६० महिन्यांपर्यंतचा सोयीस्कर कर्जकालावधी
- जलद प्रक्रियेसाठी त्वरित डिजिटल कर्जमंजुरी
- ‘टाटा एआयजी’ कंपनीकडून एक वर्षाची मोफत सौर विमा
...
वित्तीय संस्थांशी भागीदारी
ग्राहकांनी सौरऊर्जेचा स्वीकार जास्तीत जास्त करावा, यासाठी ‘टाटा पॉवर सोलारूफ’ने एसबीआय, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक यांसह १५ आघाडीच्या वित्तीय संस्थांशी भागीदारी केली असून, निवासी ग्राहकांसाठी सुलभ कर्जसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.