मुंबई

म्हाडाच्या पीएमएवायअंतर्गत सोलापूरमधील १,३४८ घरांचे उद्या वितरणण

CD

म्हाडाच्या पीएमएवायअंतर्गत सोलापूरमधील १,३४८ घरांचे उद्या वितरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) शहरी अंतर्गत म्हाडाकडून असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे आणि शेळगी येथे उभारण्यात येत आहेत. या गृहप्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील १,३४८ लाभार्थ्यांना घरांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता उत्तर सोलापूरमधील राष्ट्रतेज अटल गृहप्रकल्प, गट क्र ९२/२, दहिटणे येथे होणार आहे.
देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे, या उद्दिष्टावर आधारित केंद्र सरकारच्या पीएमएवायअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील हे दोन्ही प्रकल्प हरित पट्ट्यामध्ये राबविण्यात येत असल्याने जमीन स्वस्त दरात उपलब्ध झाली आहे. यामुळे लाभार्थी सदनिकाधारकास एक लाख रुपये प्रति सदनिकेच्या किमतीमध्ये बचत झाली आहे.
या प्रकल्पातील लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्क खर्च केवळ १,००० रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच गृहकर्जाचा मासिक हप्ता हा सध्या राहत असलेल्या घरभाडे एवढाच असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: शिवसेनेच्या सुरू असलेल्या खटल्यात न्याय कधी मिळणार? उद्धव ठाकरेंनी थेट 'ती' वेळच सांगितली! म्हणाले...

India Squad for Australia : रोहित शर्मा, विराट कोहलीच्या ODI भविष्याबाबत संकेत मिळाले, पण दोन खेळाडूंचं करियर संपल्यातच जमा झाले! संघात त्यांचे नावच नाही

Nilesh Ghaiwal: 'घ'च्या ऐवजी 'ग', घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी कसा घातला घोळ? सापडला मोठा पुरावा, १0 दिवसांपूर्वी उघडले बँक खाते

Latest Marathi News Live Update : जयंत पाटलांवरील टीकेनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर नरमले; वादावर पडदा

Lasalgaon News : बसस्थानकात विद्यार्थिनींचा आक्रोश! 'आम्ही सुरक्षित आहोत का?'; लासलगाव बस डेपोच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT