मुंबई

भाषा संवर्धनासाठी संशोधन केंद्राची उभारणी

CD

भाषा संवर्धनासाठी संशोधन केंद्राची उभारणी
मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे पाऊल


मुंबई, ता. १५ : मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या भाषेच्या विकासासाठी मुंबई विद्यापीठात मराठी समग्र व्याकरण आणि भाषा तंत्रज्ञान संशोधन केंद्र स्थापन केले जाणार आहे. यासाठीची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

संशोधन केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठात मराठी भाषेचे सर्वसमावेशक व्याकरण ‘वर्णनात्मक, प्रवर्तनीय व्याकरण, वापराभिमुख, पाठ्य, प्रतिरोधात्मक, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून नव्या तंत्रज्ञानाला पूरक ठरणाऱ्या व्याकरण संरचना पद्धतीचे संशोधन आणि अभ्यास’ हा संशोधन प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. भारतीय उच्च शिक्षणातील सर्वच अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तके आणि संदर्भग्रंथ भारतीय भाषांत लिहिण्याबाबत शिक्षण मंत्रालय, केंद्र सरकारने भारतीय भाषा समितीची स्थापना केली असून विद्यापीठ अनुदान आयोगाने उच्च शिक्षणातील सर्वच अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तके आणि संदर्भग्रंथ मराठी भाषेत लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. याच उपक्रमांतर्गत विद्यापीठ कार्यक्षेत्रात कार्यरत वा निवृत्त प्राध्यापक किंवा तज्ज्ञ व्यक्ती या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून मराठी भाषेत विविध विद्याशाखांतील विषयांवर क्रमिक पुस्तके वा संदर्भ ग्रंथ लिहू शकतात, या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विविध घटकांशी संवाद साधून या उपक्रमामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.


परदेशी तरुण, प्रौढ व्यक्तींना मराठीचे धडे
मुंबई विद्यापीठात जर्मन विभागाच्या ‘माय मराठी’ प्रकल्पाच्या माध्यमातून अन्य भाषक अशा भारतीय त्याचप्रमाणे परदेशी तरुण आणि प्रौढ व्यक्तींना मराठी शिकवले जाते. यातून सर्वसमावेषक सामग्रीतून संवादात्मक, कृतिशील आणि निर्मितीक्षम अशा पायाभूत आधारावर या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. मराठी भाषेचे काटेकोर पण परिणामकारक अध्यापन करण्याकरिता एक अद्ययावत पद्धतीने भाषा शिकवली जात आहे. यासाठी परिचारिकांसाठी मराठी, रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी, बँक कर्मचाऱ्यांसाठी मराठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी असे लघु अभ्यासक्रम चालविले जात आहेत.


मराठी भाषेतून निवड
मुंबई विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरील जवळपास चार हजार ५०० अभ्यासक्रमांची निवड मराठी भाषेमधून लिहिण्यासाठी केली आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शाखा, कला व वाणिज्य इत्यादी शाखांमधील अभ्यासक्रमांचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले.
--
सांस्कृतिक परंपरेचे संशोधन
विद्यापीठाने नुकतेच ‘सेंटर ऑफ एक्सलेंस इन हेरिटेज लँग्वेजेस अँड मल्टी कल्चरल स्टडीज’ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून भारतातील लुप्त होत चाललेल्या समृद्ध व ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या भाषा आणि सांस्कृतिक परंपरांच्या संशोधन, संवर्धन आणि प्रचारासाठी हे केंद्र प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास विद्यापीठाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana News: उत्साहाला गालबोट! नदीकाठी आंदोलन पेटलं, स्वातंत्र्यदिनी आंदोलकाला जलसमाधी; जळगावमध्ये नेमकं काय घडलं?

Trump-Putin alaska meeting: ट्रम्प-पुतिन भेट अमेरिका सोडून अलास्कामध्येच का? गुप्त भेटीच्या केंद्रस्थानी भारत

Nicholas Saldanha Died: महाराष्ट्राचे दिग्गज क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Ajit Pawar: बीडचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासन कटिबद्ध - उपमुख्यमंत्री अजित पवार

Maharashtra Politics: व्होटचोरी विरोधातील आंदोलन दडपल्या प्रकरणी कारवाई कराच, काँग्रेसची मागणी

SCROLL FOR NEXT