दोन दिवस चुलीच पेटल्या नाहीत
विक्रोळीतील खाडी भागातील झोपड्यांमध्ये भरतीचे पाणी शिरले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : विक्रोळीत विक्रमी पाऊस झाल्याने सोसायट्यांमध्ये पाणी भरले. रस्ते तुडुंब झाले. जनजीवन ठप्प झाले. खाडीलगतच्या भागात मोठी झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीत पाणी भरले तसेच झोपड्यांमध्ये खाडीचे पाणीही झिरपू लागल्याने रात्रभर जागावे लागले. परिणामी दोन दिवस अनेकांच्या चुली पेटल्या नाहीत. लोकांचे हाल झाले.
मुंबईत मंगळवारी (ता. १९) अतिवृष्टी झाली. दोन दिवस पावसाने झोडपून काढले. मुंबईत झालेल्या पावसाच्या तुलनेत विक्रोळीत विक्रमी पाऊस झाला. मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी (ता. २०) सकाळी ८ या चोवीस तासात २६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येथे झालेला पाऊस मुंबई आणि उपनगरात झालेल्या पावसापेक्षा सर्वाधिक होता. विक्रोळीला अक्षरशः झोपडून काढले. लोकांना घराबाहेर पडता आले नाही. घराबाहेर पाणी साचले होते. सोसायट्यांच्या आवारात पाणी भरले होते. विक्रोळीतील सर्व रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. दुकाने पाण्याने भरली होती. दुकानदारांचे आणि व्यावसायिकांचे नुकसान झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. स्वयंभू हनुमान नगर, तसेच खाडीलगतच्या झोपडपट्टी भागातील नागरिक पावसामुळे रडकुंडीला आल्याचे सांगण्यात आले.
सूर्यनगरमध्ये भुस्खलनाचा धोका
विक्रोळी येथील सूर्यनगर येथे भुस्खलनाचा धोका आहे. या परिसरात मोठी झोपडपट्टी डोंगराच्या पायथ्याशी वाढली आहे. तेथे हजारो लोक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. सोमवारी येथे भुस्खलन झाले. त्यात चार जण जखमी झाले होते. येथे अजूनही भुस्खलनाचा धोका आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी येथे हा धोका असतो; मात्र येथे कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याचे नागरिक सांगतात.
नवीन पुलाखाली पहिल्यांदाच पाणी भरले
विक्रोळी येथे नवीन बांधलेल्या पुलाखाली नव्याने मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. त्यामुळे येथे वाहनांना जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाला होता. पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावे लागत होते. बाजूलाच मोठा नाला आहे. तो खाडीला मिळतो. तो नाला पावसाने पूर्ण भरला होता. त्यामुळे ते पाणी रस्त्यावर आले होते. येथे मोठा अपघात होण्याचाही भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
टागोरनगरही पाण्यात
टागोरनगर ग्रूप नंबर ८,२,३ हरियाली व्हिलेज, विक्रोळी मच्छी मार्केट या भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. या भागात मोठी बाजारपेठ आहे. तेथे पाणी भरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. वसाहतीमध्ये पाणी भरल्याने नागरिकांचेही नुकसान झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.
विक्रोळीच्या खाडी भागात असलेल्या झोपडपट्टीमध्ये भरतीचे पाणी भरले होते. त्यात पाऊस असल्याने नागरिकांचे हाल झाले. लोकांच्या जेवणाखाण्याचे दोन दिवस हाल झाले. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
- सुरेश सरनोबत, स्थानिक
दोन दिवस झालेल्या पावसाने विक्रोळी भागातील नागरिकांचे नुकसाने झाले. येथे मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. प्रशासनाकडे या भागाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
-तुषार यादव, स्थानिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.