मुंबई

भटक्या श्वानाचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण

CD

‘रेबीजमुक्त मुंबई’साठी महापालिकेचा पुढाकार
भटक्या श्वानांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण

मुंबई, ता. ९ : श्वानांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावाच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने ‘रेबीजमुक्त मुंबई’साठी पुढाकार घेतला आहे.
या अनुषंगाने, महानगरपालिका आणि विविध प्राणी कल्याण संस्थांच्या सहकार्याने (मुंबई शहर व उपनगरे) भटक्या श्वानांसाठी १ सप्टेंबर २०२५ ते १५ मार्च २०२६ दरम्यान सामूहिक रेबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईकरांनी या लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्राणी कल्याण करणे व प्राण्यांपासून होणारे संक्रमण टाळण्यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, उपआयुक्त (विशेष) श्रीमती चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल्स, उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन तसेच युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी या प्राणी कल्याण संस्थांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

प्राणी सेवकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा
भटक्या श्वानांचे व्यापक प्रमाणात लसीकरण करून रेबीजपासून होणाऱ्या मानवी मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्राणी कल्याण करणे आणि समुदायाची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही या मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत. स्थानिक रहिवासी, कल्याणकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, प्राण्यांना खाऊ घालणारे व प्राणी सेवकांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच, लसीकरणासाठी येणारे कर्मचारी आणि स्वयंसेवकांना परिसरात प्रवेश देणे व भटक्या श्वानांची ओळख पटवून देणे इत्यादी कार्यवाहीमध्ये सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकने केले आहे.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT