मुंबई

मुंबई विभागाला गणराया पावला

CD

मुंबई विभागाला गणराया पावला
गणेशोत्सवात एसटीला ४.२९ कोटींचे उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवा पुरवून यशस्वीपणे वाहतूक केली आहे. मुंबई एसटी विभागाच्या माध्यमातून कोकणाकडे आणि परतीसाठी एकूण १,७८५ विशेष फेऱ्या करण्यात आल्या. यामुळे कोकणातील प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. या विशेष नियोजनामुळे एसटी महामंडळाला सुमारे चार कोटी २९ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले.
मुंबईतून कोकणातील थेट गावी, अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच सुखरूप पोहोचवते. दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गणेशोत्सव आणि गौरी उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पालघर एसटी विभागाकडून विशेष बससेवांचे नियोजन करण्यात आले होते. २३ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीत कोकणकडे जाणाऱ्या बसगाड्यांची गर्दी लक्षात घेता, विभागाकडून १,८०० फेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये मुंबई विभागाच्या स्वतःच्या बससह इतर विभागांकडूनही अतिरिक्त बस मागवण्यात आल्या होत्या.
या बस मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल आणि उरण येथून सोडण्यात आल्या. यामुळे प्रवाशांची सोय झाली. या बससाठी प्रवाशांनी आगाऊ बुकिंग केली होती. गणेशोत्सवाच्या काळात कोकणकडे जाणाऱ्या आणि कोकणातून परत येताना बसने हजारो प्रवाशांना घेऊन प्रवास केला. यामुळे एसटीला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गणेशोत्सवानंतर कोकणहून पालघरकडे परतणाऱ्या प्रवाशांसाठीही विशेष बससेवा सुरू करण्यात आली होती. यामध्ये मुंबई विभागाच्या आणि इतर काही विभागांच्या बसद्वारे वाहतूक करण्यात आली.
एकंदरीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व परत येणाऱ्या प्रवाशांसाठी सोडलेल्या बसने एकूण ७१,४०० प्रवाशांची ने-आण केली आणि एसटी महामंडळाला ४.२९ कोटी रुपयांचे अंदाजित उत्पन्न मिळाले. या नियोजनामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला तसेच एसटी महामंडळालाही चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
==
==
एसटी आगार - उत्पन्न - फेऱ्या
मुंबई सेंट्रल -६५,१४,७८२ - ३०३
परळ- ३,०९,७५,३५८- १,१९७
कुर्ला-५०,५४,३४३- २५४
पनवेल- २,७८,०९६-२७
उरण- ८२,४७३-४
एकूण - ४,२९,०८,०२२- १,७८२
--
गणेशोत्सवानिमित्त कोकणात कुटुंबीयांसह जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यंदाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी मार्गावर सर्वाधिक प्रवाशांची पसंती होती. त्यानंतर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त होती. एसटीला प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहोत.
- नितीन चव्हाण, आगारप्रमुख, परळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT