सात जीर्ण पुलांचे होणार परीक्षण
आयआयटी बॉम्बेवर जबाबदारी; १८ लाख खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : आर/दक्षिण व पी/उत्तर विभागातील तीन वाहतूक पूल आणि चार पादचारी पुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने महापालिकेने त्यांचे संरचनात्मक परीक्षण आयआयटी बॉम्बेकडून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सुमारे १८ लाखांचा खर्च केला जाणार आहे.
मे. एस. सी. जी. कन्सल्टिंग सर्व्हिसेस व मे. स्ट्रक्टॉनिक्स कन्सल्टिंग इंजिनिअर्स यांच्या तपासणीनंतर सातही पूल निष्कासित करून पुन्हा बांधकामाची शिफारस करण्यात आली होती. यामध्ये महालक्ष्मी डेअरी फार्म हनुमाननगर, कांदिवली (पूर्व) येथील पादचारी पूल, हनुमाननगर कांदिवली पूर्व येथील पादचारी पूल, गावदेवी रोड कांदिवली पूर्व येथील पादचारी पूल, नरवणे ट्रान्झिट कँप व तुळसकर झोपडपट्टी क्षेत्र यांस जोडणारा कांदिवली (प.) येथील पादचारी पूल आणि झोपडपट्टी क्षेत्र, रामनगर चाळ बिहारी टेकडी, कामराज चाळ कँपो टोबॅकोजवळ कांदिवली पूर्व येथील पादचारी पूल, सुरभी कॉम्प्लेक्ससमोरील पूल, एम. जी. रोड नं. १. साईनगर कांदिवली (प.) येथील पूल, आप्पा पाडा, कुरार व्हिलेज, गांधी टेकडी, मालाड (पू.) कांदिवली पूर्व पी/उत्तर येथील पूल यांचा समावेश आहे. यापैकी चार पूल वापरासाठी पूर्णपणे बंद करण्यात आले असून, उर्वरित चारही अंशतः बंद आहेत.
सद्य:स्थितीत काही पूल अतिशय जीर्ण अवस्थेत असल्याने अपघात टाळण्यासाठी तातडीने परीक्षण करून आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे ठरले आहे. वाहतूक किंवा पादचाऱ्यांसाठी पूल खुले ठेवले तर धोका संभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आयआयटी बॉम्बे या राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य तांत्रिक संस्थेकडे हे काम सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी लागणारा खर्च अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात येणार असून, २०२५-२६च्या सुधारित अंदाजपत्रकात आवश्यक रक्कम राखून ठेवण्यात आली आहे.
...
...म्हणून थेट नियुक्ती
महापालिका अधिनियम १८८८नुसार साधारणपणे अशा कामांसाठी निविदा काढणे बंधनकारक आहे; मात्र याप्रकरणी विशेष तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असल्याने आयआयटी बॉम्बेची थेट नियुक्ती करण्यासाठी वेळखाऊ निविदा प्रक्रियेपासून सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया न राबवता पुलांचे काम केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.