मुंबई

दिवाळी-छटसाठी विशेष रेल्वे गाड्या

CD

दिवाळी-छटसाठी विशेष रेल्वे गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : दिवाळी आणि छटपूजा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला लक्षात घेऊन विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. पुण्यातील हडपसर येथून दानापूरपर्यंत २० विशेष सेवा चालवल्या जाणार असून, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणाऱ्या धनबाद, रक्सौल आणि सहरसा गाड्यांचा कालावधी वाढविण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०३२१४ : हडपसर ते दानापूर साप्ताहिक विशेष २९ सप्टेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रत्येक सोमवारी हडपसर येथून सकाळी ६.४५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता दानापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०३२१३ : दानापूर ते हडपसर साप्ताहिक विशेष २७ सप्टेंबर २०२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रत्येक शनिवारी रात्री ९.०० वाजता दानापूर येथून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे ४.१५ वाजता हडपसर येथे पोहोचेल. या विशेष गाड्या दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड जं., भुसावळ जं., खंडवा, इतारसी जं., मदन महल, कटनी, मैहर, सतना, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर आणि आरा स्थानकावर थांबेल. या गाड्यांचे आरक्षण सोमवारपासून (ता. १५) भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व आयआरसीटी सीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: 'पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत आम्ही उभे...' कर्णधार सूर्यकुमारची पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर मोठी प्रतिक्रिया

IND vs PAK, Asia Cup: भारतच ठरला 'बॉस', पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या; कर्णधार सूर्यकुमारचं वाढदिवशी भारतीयांना स्पेशल गिफ्ट

IND vs PAK, Asia Cup: अरर! पाकिस्तानच्या राष्ट्रगीतापूर्वी अचानक मैदानात वाजलं 'जलेबी बेबी'; Video तुफान व्हायरल

Vijay Vadettiwar: आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; लढा देण्याचा निर्धार

IND vs PAK: अक्षरच्या गोलंदाजीवर मोठा शॉट मारायला गेला पण…; शानदार झेल घेत तिलकने झमानला दाखवला ‘शॉर्टकट टू पॅव्हेलियन’, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT